निवडणूक लढविणार नाही – अ‍ॅड. असीम सरोदे

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – प्रत्यक्ष निवडणूक लढविण्याच्या मार्गाने राजकारणात यावे असे आता तरी वाटत नाही. लोकांसाठी व्यापक राजकारण सुरुच राहिल परंतु राजकारणाच्या बाहेर राहून कायदेविषयक, सामाजिक आणि राजकीय कार्य करायचे ठरविल्याने आम आदमी पक्षाकडून पुणे लोकसभेची निवडणूक लढविणार नाही परंतु निवडणूकीत धर्मांध, जातीयवादी, आणि धनाढ्य शक्तींना निवडून देऊ नये असे ज्येष्ठ वकील असीम सरोदे यांनी गुरुवारी स्पष्ट केले.

आप पक्षातर्फे पुण्यातून लोकसभेची निवडणूक लढविण्याबाबतचा प्रस्ताव आपचे मुकुंद किर्दत यांनी दिला होता. माझ्या नावाचा विचार केला याबद्दल मी आप पक्षाचे आभार मानतो. प्रत्यक्ष निवडणूक लढविण्याच्या मार्गाने राजकारणात यावे, असे आता तरी वाटत नाही. लोकांसाठीच व्यापक राजकारण सुरूच राहील व त्यासाठी राजकीय पक्षाची गरज नसली तरीही चालते. पुण्यातील संभाव्य उमेदवारांची जी नावे दिल्लीला पाठवण्यात आली आहेत. त्यामध्ये अनेक चांगले पर्याय आहेत. मतदारांनी या निवडणुकीत धनाढ्य, जातीवादी- धर्मांध ताकदीला निवडून देऊ नये, असे वाटते, असे ऍड. सरोदे यांनी सांगितले.

Get real time updates directly on you device, subscribe now.

You might also like
WhatsApp WhatsApp us