आता एक्सप्रेस-वे वर ‘बिनधास्त’ १२६ किमीच्या ‘स्पीड’नं गाडी चालवा, पोलिस कारवाई होणार नाही : नितीन गडकरी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आता एक्सप्रेस-वे वाहने १२६ किलोमीटर प्रति तास वेगाने चालवण्यात आल्या तरी त्यावर कोणतेही चलन कापण्यात येणार नाही, म्हणजे कोणताही दंड आकारण्यात येणार नाही. केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांनी ही माहिती दिली. यावर त्यांनी स्पष्ट केली की, कोणतेही वाहन ठरवलेल्या वेगाच्या ५ टक्के आधिक वेगाने पळवत असल्याचे पाहिले गेले तरी मोटार व्हेईकल कायदा १९८८ च्या सेक्शन १८३ अंतर्गत ओवरस्पीड असल्याचे सांगून त्याच्याकडून कोणतेही चलन कापण्यात येणार नाही. यावेळी लोकसभेत बोलताना त्यांनी वाहनाचा सर्वाधिक वेग काय असू शकतो याची माहिती दिली.

वेगाची मर्यांदा वाढणार
नितीन गडकरी यांनी सांगितले की आता एक्सप्रेस वे वर चार चाकी वाहने १२० किलोमीटर प्रति तास या वेगाने प्रवास करु शकतात. तर बस १०० किलोमीटर प्रतितास वेगाने प्रवास करु शकतात.याशिवाय ४ किंवा त्यापेक्षा आधिक लाईन असलेल्या डिवायटर असणाऱ्या हायवेवर आणि अन्य रस्त्यावर बसचा वेग ९० किलोमीटर प्रति तास ठरवण्यात आला आहे. परंतू आता एक्सप्रेस वे वर १२६ किलोमीटर प्रतितास वेगाने प्रवास करु शकतील १२० किलोमीटर प्रतितास वेगावर ५ टक्के आधिक वेगाने वाहन चालवल्यास ते वेगाच्या सीमेचे उल्लंघन समजले जाणार नाही.

वेग सीमा नियंत्रणासाठी समिती
नितीन गडकरी यांनी लोकसभेत माहिती दिली त्यात ते म्हणाले की वेग सीमा नियंत्रणासाठी एक समितीचे गठन करण्यात आले आहेत. या समितीने वाहनांचे इंजिन आणि रस्त्यांची गुणवता यात सुधार झाल्याने वाहनांच्या वेग सीमा वाढवण्याची शिफारस केली आहे. याच शिफारसींच्या आधारे मंत्रालयांने एक्सप्रेस वे, हायवे सह इतर रस्त्यावर वाहनाच्या वेगाची सीमा वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

आरोग्यविषयक वृत्त

दात पांढरेशुभ्र हवे असतील तर लिंबाचा असा करा उपयोग

पावसाळ्यात आलू बुखार आवश्य खा, यात आहेत भरपूर ‘व्हिटामिन्स’

अपचनाची समस्या अशी दूर करा, हे आहेत प्रभावी ६ घरगुती उपाय

डोकेदुखीने त्रस्त आहात का ? हे घरगुती रामबाण उपाय करा

‘मक्याचं’ कणीस खाल्यावर लगेच पाणी पिणे पडेल ‘महागात’

‘या’ ५ कारणांमुळे होते ‘किडनी’ खराब, जाणून घ्या

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like