‘हा’ हल्ला आम्ही कधीच विसरणारही नाही आणि त्यांना सोडणारही नाही

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – ‘हा हल्ला आम्ही कधीच विसरणार नाही आणि हल्लेखोरांना सोडणारही नाही, असा इशारा सीआरपीएफने ट्विट द्वारे केला आहे. पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानला व दहशतवाद्यांना थेट इशारा दिल्यानंतर केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलानेही (सीआरपीएफ) या दहशतवादी हल्यावर संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.

बिनधास्त लढा, आम्ही पाहिजे ती मदत करू ; अमेरिकेनंतर ‘या’ मोठ्या देशाचा भारताला पाठिंबा  

जम्मू काश्मीर येथील पुलवामा येथे सीआरपीएफ जवानांवर झालेल्या दहशतवादी हल्यात ४४ जवान शाहिद झाले आहेत. या हल्याचा सर्वत्र निषेध व्यक्त केल्या जात आहे, याच दरम्यान शहीद झालेल्या जवानांना सीआरपीएफच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून श्रद्धांजली वाहण्यात आली. याचबरोबर सीआरपीएफने ट्विटसोबत श्रद्धांजलीपर एक छायाचित्र प्रसिद्ध केले आहे. ‘पुलवामामध्ये हौतात्म्य आलेल्या आमच्या बहाद्दूर जवानांना आम्ही सॅल्यूट करतो. आम्ही त्यांच्या कुटुंबीयांसोबत आहोत.

इतकेच नव्हे तर, हा हल्ला आम्ही कधीही विसरणार नाही आणि यासाठी जबाबदार असलेल्यांना माफ करणार नाही. या नृशंस हल्ल्याचा बदला घेतला जाईल,’ असेही सीआरपीएफने ट्विटमध्ये म्हटले आहे.