महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न ! एक इंचही जागा देणार नाही, येडीयुराप्पांचं वक्तव्य

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कानडी भाषकांची संघटना असलेल्या कर्नाटक नवनिर्माण सेनेच्या अध्यक्षाने महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांना सीमेवर उभे करून गोळ्या झाडल्या पाहिजेत, असे वक्तव्य केले होते. यावर शिवसेनेचे खासदार धैर्यशील माने यांनी जोरदार प्रत्यूत्तर दिले होते. तसेच काल शिवसेनेने सीमेवर जाऊन तिरडी यात्रा काढत आंदोलन केले होते. यामुळे सीमाभागात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

त्यातच बेळगावमध्ये मराठी पाट्या काल तोडण्यात आल्या. तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा प्रतिकात्मक पुतळा जाळण्यात आला. यानंतर शिवसेनेने कोल्हापुरमध्ये कर्नाटकचे मुख्यमंत्री येडीयुराप्पांचा पुतळा जाळला. याचे पडसाद आता सीमाभागात उमटू लागले आहेत. तणावाचे वातावरण निर्माण झाल्याने शनिवारी सायंकाळपासून दोन्ही राज्यांदरम्यानची बससेवा बंद करण्यात आली होती.

यावर आज येडीयुराप्पा यांनी भाष्य केले असून महाराष्ट्राला एक इंचही जमीन देणार नसल्याचे म्हटले आहे. महाजन कमिशनच्या निर्णयानुसार कोणता भाग महाराष्ट्राला द्यायचा आणि कोणता कर्नाटकला हे स्पष्ट करण्यात आले आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/