शरद पवारांनी केलं स्पष्ट, राम मंदिराच्या भूमिपूजनाचं निमंत्रण मिळालं तरी जाणार नाही, कारण…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – आयोध्येतील राम मंदिराच्या भूमीपूजनावरून शिवसेना आणि राष्ट्रवादीत भिन्न मते आहेत. राम मंदिराच्या भूमीपूजनाबाबत शरद पवार यांनी विधान केले होते. कोरोनाविरुद्ध कसं लढता येईल, यावर आम्ही विचार करतोय. पण, काही लोकांना वाटतंय की मंदिर उभारल्यानं कोरोना जाईल. त्यामागे काही करण असू शकतं. मात्र, सध्या कोरोनावर लक्ष द्यायला हवं असं शरद पवार यांनी म्हटले होते, या विधानावरून अनेक वादंग झाला होता.

यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनीही थेट उत्तर देणं टाळलं होतं, राम मंदिराच्या भूमीपूजनाबाबत आपले मत मांडताना उद्धव ठाकरे म्हणाले होते की, नुसतं हो किंवा नाही असं उत्त द्यायचं तर मी व्यक्ती म्हणून काहीही उत्तर देऊ शकेन. राम मंदिराच्या लढ्यातील शिवसेनेच्या भूमिकेची इतिहासाने दखल घेतली आहे. मी मुख्यमंत्री नसतानाही अयोध्येला गेलो होतो. योगायोगावर माझी श्रद्धा आहे. 2018 च्या नोव्हेंबरमध्ये मी तिथे गेलो आणि 2019 च्या नोव्हेंबरमध्ये हा प्रश्न सुटला, ही माझी श्रद्धा आहे. कुणाला अंधश्रद्धा म्हणायचे असेल तर खुशाल म्हणाव, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले होते.

आता शरद पवार यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. राम मंदिराबाबत कोणताही वाद नाही, सुप्रीम कोर्टाने हा वाद मिटवलेला आहे. राम मंदिर भूमीपूजन सोहळ्याला जाण्याचा निर्णय घेतला नाही. परंतु निमंत्रण मिळालं तरी मी जाणार नाही, कारण सध्या राज्यात कोरोनाची परिस्थिती गंभीर असून राज्याच्या हिताची जबाबदारी मोठी आहे, असे सांगत शरद पवार यांनी या कार्यक्रमाला जाण्यास नकार दिला आहे. एका वृत्तवाहिनीशी बोलताना शरद पवार यांनी राम मंदिर भूमीपूजनाला जाण्याबाबतचे स्पष्टीकरण दिलं.