पंतप्रधान मोदींबद्दल ‘अपशब्द’ सहन करणार नाही : देवेंद्र फडणवीस

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे, तांत्रिक बाब म्हणून फडणवीस यांनी राज्यपालांकडे आपला मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा सोपावला. कारण 8 नोव्हेंबरला 13 व्या विधानसभेचा कार्यकाळ संपणार होता. त्यामुळे फडणवीसांचा राजीनामा अपेक्षितच आहे.

फडणवीस म्हणाले की, आज मी राज्यपालांकडे राजीनामा सोपवला आहे, राज्यपालांनी तो स्वीकाराला. राज्याची 5 वर्ष सेवा करण्याची मला संधी मिळाली, त्यामुळे महाराष्ट्रातील जनतेचे आभार. केंद्राने, केंद्रातील मंत्र्यांनी केलेल सहकार्य, राज्यातील मंत्रिमंडळातील नेत्यांनी केलेले सहकार्य यामुळे मी त्यांचे आभार मानतो. आमच्या सोबत असलेल्या पक्षांचे देखील आभार मानतो.

यावेळी फडणवीस यांनी शिवसेनेचं नाव घेणं टाळलं. परंतू पुढे बोलताना फडणवीस म्हणाले, सत्तेत असून शिवसेनेकडून टीका होत होती, ते त्यांच्या मुखपत्रातून कायमच भाजपवर टीका करत होते. परंतू ते त्यांचे मुखपत्र आहे असे समजून आम्ही ते सहन केले. त्यांनी कितीही टीका केली परंतू आम्ही उद्धव ठाकरेंबद्दल कधीही कोणतीही टीका केली नाही. त्यांनी पंतप्रधान मोदींवर देखील टीका केली परंतू पंतप्रधान मोदींबद्दल अपशब्द वापरणं आम्ही सहन करु शकत नाही, असे म्हणत फडणवीस यांनी शिवसेनेवर निशाणा साधला.

महाराष्ट्राला पुढे नेण्याचे काम आम्ही केले. त्यात 4 वर्ष दुष्काळ होता आणि आता शेवटी ओला दुष्काळ. परंतू या परिस्थितीत सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं होतं, राज्यात इन्फ्रास्ट्रकचरचे काम आम्ही केले. जलयुक्त शिवारातून शेतकऱ्यांसाठी मोठे काम केले. राज्यातील जनतेसाठी काम केले म्हणूनच जनतेने महायुतीला बहुमत दिले. भाजपला देखील राज्यातील जनतेने चांगल्या जागा दिल्या. परंतू हे दुर्देव आहे की आम्ही अजून सरकार स्थापन करु शकलो नाही. निकाल आल्यानंतर जेव्हा शिवसेनेने सांगितले की आम्हाला सरकार स्थापन करण्यासाठी पर्याय उपलब्ध आहेत तेव्हा आम्हाला झटका बसला, अशी टीका माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत केली.

Visit : Policenama.com

तुमच्या चुकीच्या जीवनशैलीमुळे सुद्धा होऊ शकतो ‘मायग्रेन’ चा त्रास
भेसळयुक्त ‘कुंकू’ वापरले तर होऊ शकतात ‘गंभीर’ परिणाम, जाणून घ्या
शरीरयष्टी किरकोळ असेल तर ‘हे’ 6 पदार्थ खा, दिसाल सेलिब्रिटींसारखे फिट
चेहऱ्याचे सौंदर्य खुलवण्यासाठी करा ‘हे’ 5 घरगुती आणि सोपे उपाय, जाणून घ्या
चुकीनही करू नका ‘यो यो डाएट’, बिघडू शकते तब्येत, जाणून घ्या
‘जंक फूड’ खाण्याची सवय सोडविण्यासाठी ‘हे’ 5 खास उपाय, जाणून घ्या
सावधान ! प्लॅस्टिकच्या बॉटलमधून पाणी पिताय ? जाणून घ्या धोके