फक्त चार मिनटे वाचवण्यासाठी आरोपी बनणार का?

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन

 

बेशिस्त वाहन चालकांमुळे पुण्यामध्ये दरोरोज छोटे-मोठे अपघात होत असतात. या बेशिस्त वाहन चालकांना लगाम घालण्यासाठी वाहतूक शाखेकडून अनेक उपाययोजना आखल्या जातात. वाहतुकीची शिस्त लागावी यासाठी विशेष मोहिमा राबवून दंड वसूल केला जातो. नवे नवे प्रयोग केले जातात. असाच एक नवा प्रयोग पुणे वाहतुक विभागाचे पोलीस उपायुक्त तेजस्वी सातपुते यांनी मंगळवारी केला.

[amazon_link asins=’B019MQLWTU’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’44082125-b10b-11e8-b06a-17045e1ee8f5′]

वाहतुक पोलीस उपायुक्तांनी दोन वाहन चालकांना एकाच कंपनीच्या दोन दुचाकी दिल्या. त्यांना कात्रज ते शिवाजीनगर या १० किमीच्या मार्गावर दुचाकी चालवायला सांगितली. शिवाजीनगर येथील एका ठिकाणी दोघांनाही पोहचण्यास सांगितले. मात्र, एका दुचाकीस्वाराला वाहतुकीचे नियम पाळण्यास सांगितले तर दुसऱ्या वाहन चालकाला त्याच्या पद्धतीने नियोजीत स्थळापर्य़ंत पोहचण्यास सांगितले.  या दुचाकीस्वार शिवाजीनगर येथे आले असता त्यांच्यामध्ये केवळ चार मिनीटांचा फरक होता.

IPS अधिकाऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न, सुसाईड नोटही सापडली 

उपायुक्त तेजस्वी सातपुते यांनी ट्विटरवर नागरिकांना याची माहिती देऊन एक प्रश्न विचारला आहे. उपायुक्त सातपुते यांनी चार मिनीटांसाठी आपला जीव धोक्यात घालणार का तसेच चार मिनीटांसाठी आपण आरोपी होणार का? असा प्रश्न त्यांनी नागरिकांना विचारला आहे.

या प्रयोगावरुन वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांचा किती फायदा होते हे पहायचे होते. काही मिनीटे वाचवण्यासाठी वाहन चालक आरोपी बनत असल्याचे उपायुक्त तेजस्वी सातपुते यांनी सांगितले.

जाहिरात