पंकजा मुंडे शिवसेनेत प्रवेश करणार ? संजय राऊतांनी केला मोठा ‘गौप्यस्फोट’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – पंकजा मुंडे यांच्या पराभवानंतर त्या आता भाजप सोडून शिवसेनेत प्रवेश करणार अशी जोरदार चर्चा सध्या राजकीय वर्तुळात आहे. मात्र खासदार संजय राऊत यांनी याबाबत खुलासा केला आहे. पत्रकारांशी संवाद साधताना संजय राऊत बोलत होते यावेळी त्यांनी ठाकरे सरकारच्या अनेक निर्णयांबाबत भाष्य केले.
पंकजा मुंडे या शिवसेनेच्या वाटेवर आहेत का ? असे संजय राऊत यांना विचारले असता, शिवसेनेच्या वाटेवर अनेक लोक आहेत, मी नाव घेत नाही परंतु महाराष्ट्राचे अनेक प्रमुख नेते शिवसेनेच्या वाटेवर आहेत असे राऊत यावेळी म्हणाले. पंकजा मुंडेंबाबत १२ डिसेंबरलाच कळेल असे देखील संजय राऊत यांनी सांगितले.
ठाकरे सरकारबाबत बोलताना हे सरकार जनतेच्या हिताचा निर्णय घेईल आरे बाबत मुख्यमंत्र्यांनी घेतलेला निर्णय चांगला आहे. महाराष्ट्राची स्थिती सध्या गंभीर असल्यामुळे तसेच बुलेट ट्रेनचे ओझे हे आमच्या डोक्यावर नको असे देखील संजय राऊत यावेळी म्हणाले.
मंत्रीमंडळ विस्ताराबाबत काय म्हणाले संजय राऊत
उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर आता कोणाला कोणते मंत्री पद मिळणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागून आहे. उपमुख्यमंत्री, गृहमंत्री, अर्थ तसेच इतर महत्वाच्या खात्यांचे वाटप तीनही पक्षांमध्ये नेमके कसे होणार याची सर्वांनाच उत्सुकता आहे. त्यामुळे याबाबत संजय राऊत यांना विचारले असता मंत्रीमंडळ विस्ताराबाबत निर्णय कधी घ्यायचा याचा पूर्ण अधिकार मुख्यमंत्र्यांना आहे त्यामुळे कोणाला कोणतं खात द्यायचं याबाबत लवकरच मुख्यमंत्री निर्णय घेतील असे संजय राऊत यावेळी म्हणाले.
Visit : policenama.com
- ‘या’ खास चहाचे हे ६ आरोग्यदायी फायदे, असा तयार करा, जाणून घ्या
- नेहमी हसा, च्युइंगम खा…आणि कमी करा वजन ! ‘वेटलॉस’च्या ‘या’ खास ५ ट्रीक
- कर्करोगावर गुणकारी आहे ‘कडुनिंब’, जाणून घ्या ५ आरोग्यदायी फायदे
- मुलांच्या ‘या’ ५ गोष्टी मुलींना नाहीत पसंत, फिटनेसकडे वेळीच द्या लक्ष
- लिंबाचे ‘हे’ ७ फायदे जाणून घेतले तर तुम्ही रहाल निरोगी !
- मुल नको असल्यास आता पुरूषांसाठीही गर्भनिरोधक गोळी ! ‘ही’ आहेत ३ वैशिष्ट्ये
- प्रेयसीचे ओठ थरथरले, लवलवले तर ‘ही’ सुद्धा असू शकतात ६ कारणे