PMC बँक राज्य सहकारी बँकेत विलीन होणार ? राज्य सरकारकडून हालचालींना वेग

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – पीएमसी बँकेतील खातेदारांचं आर्थिक नुकसान होऊन नये यासाठी राज्य सरकारनं मोठं पाऊल टाकलं आहे. पीएमसी बँक राज्य सहकारी बँकेत विलीन करण्याच्या राज्य सरकारचा विचार आहे. यासाठीच्या हालचालींना राज्य सरकारडून वेग आल्याची माहितीही समोर आली आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी याबाबत चर्चा सुरू असल्याचं म्हटलं आहे. माध्यमांशी ते बोलत होते.

पीएमसी बँकेतील खातेरदारांचे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी या महत्त्वाच्या निर्णयावर राज्य सरकारचा विचार सुरू आहे. राज्य सरकारनं याबाबत पावलं टाकायला सुरुवात केली आहे. गरज पडलीच तर आरबीयसोबतही चर्चा करू असंही राज्य सरकारनं म्हटलं असल्याचं जयंत पाटील यांनी सांगितलं. पीएमसी बँकेतील खातेदारांना अनेक अडचणींना सामोरं जावं लागत आहेत हे पाहता त्यांचे अधिक आर्थिक नुकसान होऊ नये यासाठी राज्य सरकारनं हा मोठा आणि महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

काय आहे पीएमसी घोटाळा ?
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) नियुक्त केलेल्या अधिकाऱ्याच्या तक्रारीवरून बनावटगिरी, फसवणूक आणि गुन्हेगारी कट रचल्याच्या आरोपावरून पीएमसी बँकेच्या अधिकाऱ्यांविरोधात कारवाई सुरू झाली होती. यासंदर्भात आठवड्याच्या सुरूवातीस मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रार दाखल करण्यात आली होती. पोलिसांनी सांगितले होते की प्राथमिक तपासणीनुसार २००८ पासून बँकेचे ४३५५.४६ कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. FIR मध्ये पीएमसी बँकेचे माजी अध्यक्ष वरम सिंग, मॅनेजर डायरेक्टर जॉय थॉमस, एचडीआयएलचे संचालक आणि इतर अधिकाऱ्यांची नावे आहेत.