पिंपरी मंडईतील विक्रेत्यांना सुविधा उपलब्ध करुन देऊ : आ.अण्णा बनसोडे

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन – पिंपरीतील उड्डाणपुलाखाली असणा-या मंडईतील विक्रेत्यांना सेवासुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी लवकरच आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या बरोबर बैठक घेऊ असे आमदार अण्णा बनसोडे यांनी सांगितले.

आ. बनसोडे यांचा पिंपरीतील फ्रुट मार्केट व लाल बहादूर शास्त्री भाजी मंडईच्या वतीने सत्काराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष संजोग वाघेरे पाटील, माजी उपमहापौर व ज्येष्ठ नगरसेवक हिरानंद उर्फ डब्बू आसवानी, नगरसेविका निखीता कदम, फ्रुट मार्केटचे अध्यक्ष सुनिल शिरसाठ, भाजी मंडईच्या अध्यक्षा अलकाताई हाके, रविंद्र वाणी, गणेश वाणी, अनिल गायकवाड, अण्णा जाधव, भाऊ आडावळे, शारदा लांडगे, पांडूरंग गुंजाळ, विकास टाकळकर आदी उपस्थित होते.

आ. बनसोडे म्हणाले की, मंडईतील परिसरात भुरट्या चो-यांचे प्रमाण वाढले आहे. शहरभर स्वच्छ अभियान राबविले जात असताना शहराच्या मध्यवर्ती भागात असणा-या पिंपरी मंडईकडे आरोग्य विभागाचे दुर्लक्ष होत आहे. येथे नेहमी नागरिकांची वर्दळ असते. भाजी मंडई,  फ्रुट मार्केट, मच्छी मार्केट, मासळी मार्केट व मटन मार्केटमधील विक्रेत्यांची संख्या पाहता येथे एकच शौचालय आहे. या समस्या कायमस्वरुपी सोडविण्यासाठी पाठपुरावा करु असे आमदार बनसोडे म्हणाले. स्वागत सुनिल शिरसाठ, सुत्रसंचालन विकास टाकळकर आणि आभार अलका हाके यांनी मानले.

Visit : Policenama.com