राणे कुटूंबीय भाजपला राम राम ठोकणार ? खुद्द नारायण राणेंनी दिलं ‘हे’ उत्तर

सिंधुदुर्ग : पोलीसनामा ऑनलाइन – विधानसभेच्या पार्श्वभूमीवर राज्यात विविध पक्षातून भाजपात इनकमिंग झालं होतं. त्यानंतर सर्वाधिक जागांवर विजयी होऊन देखील भाजपला राज्यात सत्तास्थापन करण्यात अपयश आलं. निवडणूकीपूर्वी राणे पिता-पुत्र यांनी फडणवीसांच्या उपस्थित भाजपात प्रवेश केला. त्यानंतर कणकवलीतून नितेश राणे विजयी झाले परंतू भाजपची सत्ता मात्र गेली.

त्यानंतर वावड्या उठण्यास सुरुवात झाली ती भाजपातून अनेक आमदार फुटून राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेनेत प्रवेश करतील. त्यातच आता चर्चा सुरु झाली ती नारायण राणे आणि कुटूंबात भाजप सोडून जाणार का? यावर खुद्द नारायण राणेंना भाष्य करावं लागलं. यावर बोलताना राणे म्हणाले की मी आता अन्य कोणत्याही पक्षात जाणार नसून यापूर्वी दोन पक्ष बदलले, आता पक्ष बदलणार नाही. मी आणि माझे दोन्ही मुले शेवटपर्यंत भाजपमध्येच राहतील.

नारायण राणे हे पहिल्यांदा शिवसेनेत होते त्यानंतर त्यांना ‘हात’ हातात घेतला आणि काँग्रेस सरकारमध्ये मंत्रिपद घेतले. परंतू त्यानंतर काँग्रेस नेतृत्वावर टीका करण्यात आल्याने त्यांना पक्षातून काढण्यात आले. त्यानंतर त्यांनी नव्या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाची स्थापना केल्यानंतर राणेंनी सिंधुदूर्ग जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूकीत यश मिळाले. त्यानंतर राणे भाजपच्या कोट्यातून राज्यसभेवर खासदार झाले. परंतु विधानसभेच्या पार्श्वभूमीवर त्यांनी भाजपात प्रवेश केला. शिवसेनेने त्यांच्या भाजप प्रवेशाला विरोध केला होता.

शिवसेनेने कितीही टीका केली तरी त्याला उत्तर न देण्याचे राणेंनी ठरवले. युतीत असताना नितेश राणेंच्या विरोधात शिवसेनेकडून आपला उमेदवार देण्यात आला. नितेश राणे कणकवली मतदारसंघातून निवडून आले, मात्र राणे – शिवसेना संघर्ष लोकांना पाहिला. निवडणूकीचे निकाल लागले परंतु महायुती तुटली, त्यानंतर नारायण राणे त्यांनी शिवसेनेवर जोरदार निशाणा साधला. त्यामुळे आता हा संघर्ष आणखी तापणार अशी शक्यता आहे.

फेसबुक पेज लाईक करा : https://www.facebook.com/policenama/