‘बिग बीं’च्या ‘शहंशाह’ सिनेमाच्या रिमेकमध्ये रणवीर सिंग साकारणार लिड रोल ? मॉडर्न असेल स्टोरीचा ‘प्लॉट’ !

पोलिसनामा ऑनलाइन –बॉलिवूडचे मेगास्टार बिग बी अमिताभ बच्चन यांच्या ब्लॉकबस्टर हिट अशा शहंशाह या सिनेमाच्या रिमेकबद्दल सध्या जोरदार चर्चा होताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून 1988 साली रिलीज झालेल्या या सिनेमाच्या रिमेकबद्दल बोललं जाताना दिसत आहे.

एका इंग्रजी वृत्तानुसार, टिन्नू आनंद म्हणाले, “मी शहंशाहचा रिमेक बनवणार आहे. परंतु आधी हा कोरोनाचा हल्ला दूर होऊ द्या. हे माझ्यो डोक्यात आहे त्यामुळं मी हे नाही सांगू शकत की, कधी सुरू करेन, कधी रिमेक बनवेन किंवा रिमेक नेमंक कधीपासून सुरू होईल.”

सिनेमाच्या रिमेकच्या बातमीनंतर हा सवाल समोर येऊ लागला की, यात प्रमुख भूमिका कोण साकारणार आहे. टिन्नूनं अद्याप कास्टींग फायनल केलेली नाही. परंतु रणवीर सिंगचं नाव समोर येताना दिसत आहे.

बी टाऊनमध्ये अशी चर्चा आहे की, रणवीर सिंगनं हा रोल करावा अशी टिन्नूची इच्छा आहे. दोन्ही पार्ट्या सध्या लॉकडाऊन संपण्याच्या प्रतिक्षेत आहेत. जेणेकरून त्यांना या मु्द्द्यावर एक मोठी मीटींग घेता यावी. टिन्नू यांनी सांगितलं की, अनेक लोक त्यांच्याकडे या सिनेमाचे राईट्स खरेदी करण्यासाठी आले आहेत. यानंतर त्यांनी विचार केला की, आपणच आपल्या या लँडमार्क सिनेमाचा रिमेक करूया. शहंशाह हा सिनेमा 32 वर्षांपूर्वी रिलीज झाला होता. त्या काळात सिनेमानं 6 कोटींचा बिजनेस केला होता. अमिताभ बच्चन यांनी यात प्रमुख भूमिका साकारली होती. त्यामुळं जर आता याचा रिमेक केला तर तो मॉडर्नाईज असेल.