शिवसेना ‘किंग’ होणार की ‘किंगमेकर’ ? ‘मातोश्री’वर शनिवारी बैठक

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – नुकतीच विधानसभेची मतमोजणी पार पडली. भापज-सेनेच्या महायुतीने विश्वास व्यक्त केला होता की, या निवडणुकीत त्यांना 220 पेक्षा जास्त जागा मिळतील परंतु प्रत्यक्ष पाहता महायुतीचं हे स्वप्न भंगलं आहे. प्रत्यक्षात पाहता 2014 च्या तुलनेत या जागा कमी आहेत. स्पष्ट बहुमतासाठी आवश्यक जागा न मिळाल्याने भाजप सत्ता स्थापनेसाठी आता शिवसेनेवर अवलंबून आहे. भाजपला 40 जागा कमी पडल्या आहेत.

भाजप स्पष्ट बहुमतापासून 40 जागा दूर आहे त्यामुळे भाजपसमोर आता मोठं आव्हान आहे. कारण सत्ता स्थापन करण्यापासून ते सरकार चालवपर्यंत भाजपला शिवसनेनेची मदत घावी लागणार आहे. अशात राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने शिवसेनेला मुख्यमंत्री पदासाठी खुली ऑफर दिली आहे. 56 जागा जिंकणारी शिवसेना किंगमेकर बनली आहे. त्यामुळे शिवसेनेच्या भूमिकेकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे.

शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे सर्व विजयी उमेदवार आणि नेत्यांची मातोश्रीवर बैठक घेणार आहेत. शनिवारी ही बैठक पार पडणार आहे. यात सत्तेबद्दल निर्णय होणार आहे. त्यामुळे पुढील पाच वर्षात होणारं राजकारण या बैठकीतील निर्णयावर ठरणार आहे. आता युतीचा धर्म पाळून किंगमेकर व्हायचं की, किंग होण्यासाठी मुख्यमंत्रीपदाची मागणी करायची हा निर्णय बैठकीत घेतला जाणार आहे.

Visit : Policenama.com