सौरव गांगुलीची ‘दादागिरी’ खरंच BCCI मध्ये चालणार का ?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि बंगाल क्रिकेट संघटनेचा अध्यक्ष सौरव गांगुली याची बीसीसीआयच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. आज त्याने आपल्या अध्यक्षपदाचा कारभार स्वीकारला असून भारतीय संघाचा केवळ चौथा खेळाडू आहे ज्याने बीसीसीयायचे अध्यक्षपद भूषविले आहे. त्यामुळे आता भारतीय संघाबरोबरच प्रशासनामध्ये देखील मोठे बदल करण्याचे आव्हान गांगुलीपुढे आहेत. त्यामुळे आता गांगुली कशाप्रकारे कारभार करतो याकडे सगळ्यांचे लक्ष लागून आहे. मात्र याच गांगुलीच्या प्रवासाकडे नजर टाकल्यास हा तोच गांगुली आहे का ? असा प्रश्न पडतो.

गांगुली याने कर्णधारपद स्वीकारले त्यावेळी भारतीय संघ इतका मजबूत स्थितीत नव्हता, मात्र गांगुलीने आपला संघ बांधत भारतीय संघाला यशाच्या शिखरावर नेऊन ठेवले. गांगुलीने भारतीय संघाला वर्ल्डकपच्या फायनलमध्ये प्रवेश करून दिला तर ऑस्ट्रेलियासारख्या कडव्या संघाला त्यांच्याच भूमीत लोळवले. त्यामुळे आता या गांगुलीची मैदानावरील दादागिरी हि प्रशासनात देखील चालणार की नाही हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. गांगुलीने संघ बांधणीबरोबरच खेळाडू देखील घडवले. त्याने झहीर, हरभजन, सेहवाग, गंभीर, युवराज असे विविध खेळाडू घडवले. त्याचबरोबर त्याने आपल्या गोलंदाजांना आणि फलंदाजांना देखील सूट दिली होती. त्यामुळे ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रलिया दौऱ्यावर भारतीय गोलंदाजांनी स्टीव्ह वॉ याला इतके जखडून ठेवले की, तो चक्क हँडल दी बॉल या नियमामुळे बाद झाला. त्यानंतर गांगुलीने भारतीय संघाला विजयाची सवय लावली.

कारकिर्दीत अनेकवेळा त्याला अपयशाचा देखील सामना करावा लागला. त्यामुळे शेवटी त्याला संघाच्या बाहेर करण्यात आले. मात्र त्याने शेवटी पुन्हा एका पुनरागमन करत आपली किंमत काय आहे हे दाखवून दिले. त्याच्या निवृत्तीच्या शेवटच्या सामन्यात देखील त्याला कर्णधार धोनी याने योग्य सन्मान दिला. सामन्याच्या शेवटच्या काही षटकांत त्याने गांगुलीकडे कर्णधारपद सोपवून त्याचा योग्य तो सन्मान देखील केला. त्याच्यासारखा आक्रमक कर्णधार भारतीय संघाला कधीही मिळाला नव्हता. मात्र त्याच्या याच आक्रमक वृत्तीने त्याने भारतीय संघाला विजयाची सवय लावली. मात्र आता हाच त्याचा मैदानावरील आक्रमकपणा मैदानाबाहेर देखील राहणार का ? हे म्हणजे महत्वाची गोष्ट आहे. गांगुली बीसीसीआयच्या अध्यक्षपदी विराजमान झाला असला तरी त्याला कुणी बसवले कि त्याला त्याच्या कष्टाने हि जागा मिळाली हा संशोधनाचा विषय आहे. मात्र जगनमोहन दालमिया यांचा मानसपुत्र असल्याने कदाचित त्याला हि संधी लवकर देण्यात आली. ब्रिजेश पटेल आणि गांगुली यांच्यात झालेल्या निवडीमध्ये गांगुलीने बाजी मारली आणि या महत्वाच्या पदावर विराजमान झाला.

दरम्यान, या पदावर विराजमान झाल्यानंतर गांगुली त्याच्यापद्धतीने कारभार हाकतो कि, त्याला कुणी कंट्रोल करतो हे पाहणे देखील महत्वाची गोष्ट आहे. त्यामुळे पुढच्या दहा महिन्यांमध्ये या सर्व गोष्टी स्पष्ट होणारच आहेत.

Visit : Policenama.com