‘ठाकरे बंधू एकत्र येणार?’, राज यांच्या विधानानंतर आता CM उद्धव ठाकरेंनीही दिले उत्तर, म्हणाले..

मुंबई: पोलीसनामा ऑनलाइन – दोन दिवसापूर्वीच मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांना एका वेबिनारमध्ये राज्याच्या राजकारणात ठाकरे बंधू एकत्र येणार का?, असा प्रश्न विचारला असता त्यांनी परमेश्वरास ठाऊक अशा दोनच शब्दांत मार्मिक उत्तर दिले होते. आता सध्याचा काळ पाहता या प्रश्नांची उत्तरे नाहीत. इतर कुणाकडेही असतील असे वाटत नाही, असे राज (Raj Thackeray) म्हणाले होते.

राज ठाकरेंच्या या विधानानंतर आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील भाष्य केले आहे. त्यांना एका वेबिनारमध्ये शिवसेना अन् मनसे एकत्र येणार का?, असा सवाल विचारण्यात आला.

त्यावर देशासाठी अन् राज्यासाठी जे एकत्र येऊ शकतात, त्यांनी आताच्या घडीला एकत्र यावे.

सध्या देशात जे संकट आहे ते काही साधं नाही.

या परिस्थितीला योग्यप्रकारे सामोरे गेलो नाहीतर देशात अराजक येईल, असे ते म्हणाले.

मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले की, माझी प्राथमिकता जीव वाचवण्याला आहे, घरचा कर्ता पुरुष गेला तर अर्थचक्राला काय अर्थ?, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

तसेच माझे म्हणण आहे जे- जे या विचारासाठी एकत्र येऊ शकतात.

त्यांनी एकत्र यायला हवे. राजकारण थांबवावे असे आवाहन देखील त्यांनी केलं. तसेच ज्या गोष्टी परमेश्वरला माहिती आहे.

त्या मला माहिती असणे शक्य नाही, असे मिश्किल भाष्य उद्धव ठाकरे देखील यांनी केले आहे.

शिवसेना अन् भाजपा पुन्हा एकत्र येणार का?

पुन्हा भाजपा-तुम्ही एकत्र येणार किंवा भाजप -राष्ट्रवादी एकत्र येणार अशा अफवा उठतात, तर या अफवाच आहेत का?, असा प्रश्न उद्धव ठाकरेंना विचारण्यात आला.

त्यावर कुरघोड्या असत्या तर हे सरकार चाललेच नसते.

सरकार स्थापन झाले त्यावेळी मी नवखा होतो. पण आम्ही एकमताने एकत्र आल्याचे उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.

तसेच शिवसेना आणि भाजपा पुन्हा एकत्र येणार की नाही, असा सवाल विचारल्यानंतर त्याच उत्तर दोन्ही पक्ष वेगळे का झाले यात आहे.

एका विचाराने झालेली युती तुटली का, याचे उत्तर शोधावे लागेल, असे ते म्हणाले. आमची युती 30 वर्षाची होती. आम्ही एका ध्येयाने एकत्र राहिलो होतो.

प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे यांच्याशी आमचे कौटुंबिक नातेसंबंध होते.

 

गरोदरपणात ‘योग’ करणे किती बरोबर ?

 

मान्सूनचे महाराष्ट्रात आगमन, कोकणासह सोलापूरपर्यंत मारली मजल