‘या’ अभिनेत्रीला शुटींग दरम्यान झालेली दुखापत कधीही बरी होणार नाही?

मुंबई : वृत्तसंस्था

सलमान खान आणि अभिनेत्री जॅकलिन फर्नांडीस यांचा बहुप्रतिक्षीत ‘रेस-३’ हा चित्रपट शुक्रवारी प्रदर्शित होणार आहे. परंतु या चित्रपटाच्या शुटिंगदरम्यान जॅकलिनचा अपघात झाला होता. शुटिंगदरम्यान तिच्या डोळ्याला दुखापत झाली होती. जॅकलिनने शुटिंगवेळी डोळ्याला झालेल्या दुखापतीचा एक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. हा फोटो शेअर केल्याने जॅकलिनची दुखापत कधीही बरी होणार नाही का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

दरम्यान, इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटोला जॅकलिनने एक कॅप्शन दिले आहे. ‘ही एक परफेक्ट दुखापत आहे आणि ती कमी झालेली नाही. परंत देवाच्या कृपेने मी अजूनही पाहू शकते,’ असे कॅप्शन जॅकलिनने दिले आहे.

याआधी निर्माता रमेश तौरानी यांनीही जॅकलिनच्या डोळ्याला दुखापत झाल्याचे म्हटले होते. ‘रेस-३’ च्या सेटवर स्क्वॅश खेळताना ही दुखापत झाल्याचे रमेश तौरानी यांनी सांगितले होते.