लव जिहादवरून महाआघाडीत होणार वादंग; भाजपने हिंदुत्वाच्या मुद्यावरून सेनेला डिवचलं

मुंबई  : पोलीसनामा ऑनलाइन –   मध्य प्रदेश, उत्तर प्रदेशच्या धर्तीवर महाराष्ट्रातही लव जिहाद ( Love Jihad) विरोधी कायदा करावा, अशी मागणी भाजपने केली असता, महाराष्ट्रात अशा कायद्याची गरज नसल्याचे कॉंग्रेसने म्हटले आहे. त्यामुळे भाजपने शिवसेनेला पुन्हा हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून (love-jihad-bjp-will-target-shiv-sena-over-hindutva) डिवचले आहे.
याबाबत काँग्रेसचे मंत्री अस्लम शेख म्हणाले की, लोकांचे हाल होत आहेत, नोकऱ्या मिळत नाहीत, लोक आत्महत्या करत आहेत, त्याकडे लक्ष देण्याऐवजी गाय वाचवण्यासाठी कायदा करणे, स्वत: मुख्यमंत्री असताना गाेशाळेत अनेक गाई उपाशी मेल्या होत्या. लव जिहाद सोडा, महिलांना सुरक्षा, नोकऱ्या कशा मिळणार, कोरोनातून कसे सावरणार याकडे लक्ष देण्याची गरज आहे. त्यामुळे लव जिहादसारख्या फालतू गोष्टींना महाराष्ट्रात थारा नाही, लव जिहादविरोधी कायद्याची गरज नाही असे ते म्हणाले.

तर महाराष्ट्र सरकारमधील काँग्रेस नेते जे वक्तव्य करत आहेत, लव जिहादच्या नावाखाली महिलेवर अन्याय करणे, तिचा जीव घेणे, याचे शिवसेना समर्थन करतेय का? बाळासाहेब ठाकरेंनी लव जिहादबद्दल जे मत मांडले होते. ते सत्तेच्या लालसेपोटी शिवसेना नेते बाळासाहेबांच्या विचारांना विसरले का? कुठे गेले शिवसेनेचे हिंदुत्व? असा सवाल आमदार राम कदम यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना विचारला आहे.

मध्य प्रदेशात शिवराज सरकार लव जिहादवर कायदा बनवण्यासाठी विधेयक आणणार आहे. या विधेयकानुसार फसवणूक करून लग्न केल्यास 5 वर्षांची जेलची हवा खावी लागणार आहे. मध्य प्रदेशात धर्म स्वातंत्र्य विधेयक 2020 आणण्याची तयारी सुरू आहे. हे विधेयक पुढच्या अधिवेशनात मांडले जाईल, असं गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी सांगितले.

गो कॅबिनेटची स्थापना

गाय संरक्षणासाठी गो कॅबिनेट स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गोपाळाष्टमीच्या दिवशी गो कॅबिनेटची पहिली बैठक पार पडणार आहे. या कॅबिनेटअंतर्गत पशुपालन, वन, पंचायत आणि ग्रामीण विकास, अर्थ, गृह आणि शेतकरी कल्याण विभागाचाही समावेश करण्यात येणार असल्याची माहिती मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी दिली.