उद्धव ठाकरे हेच 5 वर्ष मुख्यमंत्री राहतील की राष्ट्रवादी दावा करणार ? सुप्रिया सुळे म्हणाल्या…

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – काही दिवसापूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांनी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदींची (Prime Minister Narendra Modi ) भेट घेतली. त्यानंतर या भेटीमुळे राजकीय वर्तुळात अनेक चर्चा रंगल्या होत्या. ही चर्चा संपत नाही तोच काँग्रेसचे प्रदेशाध्य़क्ष नाना पटोले (Nana Patole ) यांनी मुख्यमंत्रीपदाची इच्छा व्यक्त केली. त्यानंतर शिवसेना नेते खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) यांनी उद्धव ठाकरे हेच 5 वर्ष मुख्यमंत्री राहतील असे विधान केले. मात्र, पुण्यात एका कार्यक्रमात राष्ट्रवादीच्या नेत्या व खासदार सुप्रिया सुळे (MP Supriya Sule) यांना पत्रकारांनी ठाकरे हेच मुख्यमंत्रीपदी राहतील का राष्ट्रवादी NCP पण दावा करणार? असा प्रश्न विचारला त्यावर त्यांनी प्रतिक्रिया दिली. या प्रश्नावर त्यांनी 5 वर्षे महाविकास आघाडी Mahavikas Aghadi सरकार टिकणार हे पवार साहेबांनी सांगितले आहे. त्यामुळे एखाद्या विषयावर एकदा पवार साहेब बोलले की आम्ही कुणी बोलत नसल्याचे सुळे म्हणाल्या.

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

Sambhajiraje Meets Uadayanraje | उदयनराजेंचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल, राजे म्हणाले – ‘संभाजी राजेंच्या आंदोलनाला माझा पाठिंबा’ (Video)

खासदार सुप्रिया सुळे MP Supriya Sule यांनी सोमवारी पुणे जिल्हा परिषदेला (Zilla Parishad) भेट दिली.
यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केले.
सुळे यांनी प्रशांत किशोर आणि राष्ट्रवादीचेचे NCP सर्वेसर्वा शरद पवार Sharad Pawar यांच्या बैठकीबाबत बोलताना मी प्रत्यक्ष त्या बैठकीला उपस्थित नव्हते.
त्यामुळे त्याविषयी जास्त काही सांगू शकत नाही, असे म्हणाल्या.
कोरोनामुळे देशात डिजिटल डिव्हाईड तयार झाला आहे.
एकूणच शिक्षणाची अन् त्यातही ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची काळजी वाटते.
सलग दुस-या वर्षी अजूनही प्रत्यक्ष शाळा सुरू नाहीत.
मोदींनी लसीकरणावरून Vaccination राज्यांवर टीका केल्याचा संदर्भ घेऊन त्या म्हणाल्या, लसीकरणावरून एकमेकावर टीका करायची ही वेळ नाही.
लवकरात लवकर लसीकरण पूर्ण होणे गरजेचे आहे.
तसेच राजगडाचा सिंहगड होऊ देऊ नका या गिर्यारोहकांच्या म्हणण्यावर काय प्रस्ताव आहे आधी बघूया, स्थानिक लोकांची काय मते आहेत ते बघून बोलेन असेही सुळे यांनी सांगितले.

Web Title : will uddhav thackeray remain chief minister for 5 years or ncp make claim ncp leader and mp supriya sule said

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

ST महामंडळ आता सुरु करणार पार्सल अन् कुरीअर सेवा, उत्पन्न वाढीसाठी घेतला निर्णय; वार्षिक 500 कोटींच्या उत्पन्नाचे उद्दिष्ट

आता ‘पाकिस्तान क्रिकेट लीग’वरही ‘सट्टा’; सट्टेबाजी करणार्‍या 4 जणांना पोलिसांनी केली अटक