कोण तोडणार सचिनच्या 76 वेळा ‘मॅन ऑफ द मॅच’ अवार्डचं रेकॉर्ड, ‘हा’ खेळाडू इतिहास घडविण्याच्या जवळ

पोलीसनामा ऑनलाईन टीम – भारतीय क्रिकेट संघाचा माजी खेळाडू सचिन तेंडूलकरने त्याच्या कारकिर्दित अनेक विक्रम केले आहेत. त्याचे हे विक्रम आजवर कोणीही मोडू शकले नाहीत. खरेतर सनथ जयसुर्या हे विक्रम मोडू शकला असता मात्र त्यालाही ते मोडता आले नाहीत. पण विराट कोहली सचिनचे विक्रम मोडू शकतो अशी शक्यता तज्ज्ञांनी वर्तविली आहे. विराटच्या नावावर आतापर्यंत अनेक विक्रम आहे. त्यांने ४२ वेळा सामनावीर च्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. तो असा एकमेव फलंदाज आहे ज्याच्यात सचिनचे हे विक्रम मोडण्याची क्षमता आहे.

विराट मुळचा राहणारा दिल्लीचा. भारतीय क्रिकेट संघात त्याच्या कारकिर्दिला सुरवात होण्यापुर्वी त्याने वेगवेगळ्या वयोगटातून शहर क्रिकेट संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. त्याच्या नेतृत्वाखाली भारताच्या अंडर १९ संघाने २००८ मध्ये मलेशियात झालेला विश्वकप जिंकला होता. त्यानंतर वयाच्या १९ व्या वर्षी श्रीलंका विरुद्ध झालेल्या एकदिवसीय सामन्यातून त्याने भारतीय क्रिकेट संघात पदार्पण केले. सुरवातीला संघात राखीव फंलदाज म्हणून खेळला. त्यानंतर त्याने स्वतःला सिद्ध करत त्याचे संघातील स्थान कायम केले.

संघात स्वतःचे स्थान मिळविल्यानंतर २०११ मध्ये विश्वकप जिंकला. सचिनने त्याच्या कारकिर्दित ७६ वेळा सामनावीराचा किताब मिळविला आहे आणि आजपर्यंत कोणीही त्याचा विक्रम मोडू शकले नाही. सनथ जयसुर्या हा विक्रम मोडू शकला असता मात्र त्यालाही हा विक्रम मोडता आला नाही.

आरोग्यविषयक वृत्त –

 

You might also like