पंतप्रधान मोदींचे स्वागत करणार का ? खा. राऊतांनी दिले ‘हे’ उत्तर

पोलीसनामा ऑनलाइन : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (शनिवारी) पुण्याच्या दौऱ्यावर (Prime Minister Narendra Modi coming to Pune today) येत आहेत. तसेच कंगना रणौतला नुकसानभरपाई देण्याच्या उच्च न्यायालयाच्या निर्णयावर शिवसेनेचे राज्यसभा खासदार संजय राऊत (Shiv Sena leader Sanjay Raut) यांनी भाष्य केले आहे. आज सकाळीच राऊत यांनी सीबीआय आणि ईडीवर एक कार्टून पोस्ट (A cartoon post on CBI and ED) करत, खळबळ उडवून दिली आहे. दरम्यान, पंतप्रधान मोदी पुण्यात येत आहेत. महाराष्ट्राने राष्ट्रीय नेत्यांचे खुल्या दिलाने स्वागत केले आहे. मोदी पंतप्रधान असून, त्यांचे स्वागत करणे आमचे कर्तव्य आहे, असेही राऊत म्हणाले.

संघर्ष करण्याचा महाराष्ट्र आणि पश्चिम बंगालचा स्वभाव आहे. राज्यात सत्तापरिवर्तन करण्याची त्यांची इच्छा आहे, आमच्या त्यांना शुभेच्छा आहेत. आम्हाला शुद्ध राजकारण करायचे आहे. जे कार्टून मी शेअर केले ती लोकांची भावना आहे. दबावाचे राजकारण करायचे असेल, तर करा. आम्ही संयमाने या गोष्टी घेत आहोत, आणि मजाही लुटत आहोत. व्यंग ज्यांना समजले ते त्या पद्धतीने घेतील. ज्यांना नाही समजले ते आणखी सूडबुद्धीने वागतील. ज्या लोकांना विकृत आनंद घ्यायचा आहे ते घेतील. सगळे विकत घ्यायचे, गुलाम तयार करायचे ही ईस्ट इंडिया कंपनीची परंपरा होती. विरोध करणे हे विरोधी पक्षाचे काम आहे. विधायक पद्धतीने तो व्हाय़ला हवा, अशी अपेक्षा राऊत यांनी ठाकरे सरकारच्या वर्षपूर्तीला व्यक्त केली आहे.

मी संविधानाची पुस्तके मागवली आहेत : खा. राऊत
कंगनाचे बेकायदेशीर बांधकाम पाडल्यावर उच्च न्यायालयाने महापालिकेला फटकारले आहे. यावर राऊत यांनी बोलण्यास नकार देत ती कारवाई पालिकेची होती. मला असे वाटतेय की महापौरांनी सूचक विधान केले आहे. बेकायदेशीर बांधकाम पाडण्याची कारवाई बेकादेशीर कशी होऊ शकते, हे पाहण्यासाठी मी संविधानाची पुस्तके मागविली आहेत, असा टोलाही राऊत यांनी हाणला आहे.