दीव्यांगाना शासकीय योजनांचा लाभ मिळण्यासाठी प्रयत्न करणार : अंकिता शहा

इंदापूर : पोलीसनामा ऑनलाइन (सुधाकर बोराटे) – जागतिक अपंग दिनानिमित्त इंदापूर शहरातील श्रीराम मंदिर, कसबा येथे अपंग लाभार्थी मेळाव्यात बोलताना इंदापूर नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा अंकिता मुकूंद शहा यांनी दिव्यांगाना शासकीय योजनांचा लाभ मिळवुन देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे मत व्यक्त केले. यावेळी उपस्थित सर्व दिव्यांगाना गुलाब पुष्प देऊन नगराध्यक्षांच्या हस्ते सन्मानीत करण्यात आले. दिव्यांगाना शासकीय योजनांची माहिती व्हावी या उद्देशाने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. तसेच कीर्तनाचा कार्यक्रम यावेळी आयोजित करण्यात आला होता.

अंकिता शहा म्हणाल्या की, “इंदापूर नगरपरिषद मार्फत व शासनाच्या निर्णयानुसार विविध योजना राबविण्यात येतात. त्यामध्ये पाच टक्के प्रमाणे सर्व अपंग लाभार्थ्यांना निधी वितरीत करण्यात येईल. राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान अंतर्गत स्वामी समर्थ माऊली व उत्कर्ष या बचत गटांना प्रत्येकी दहा हजार रुपयांचा फिरता निधी यापूर्वी वितरित करण्यात आला आहे. शासनामार्फत येणाऱ्या सर्व योजनांचा लाभ सर्व अपंग बांधवांना देण्यात येईल.”

यावेळी इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव मुकुंद शहा, सहाय्यक प्रकल्प अधिकारी सुभाष ओहोळ, अल्ताफ पठाण यावेळी उपस्थित होते.कार्यक्रमाचे आयोजन बाबासाहेब पाटोळे, दीपक आरडे, दशरथ क्षिरसागर, माधुरी परदेशी यांनी केले.

Visit : policenama.com