शहराचा वारकरी सांप्रदायायिक वारसा जपण्याचे काम करू : महापौर जाधव

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाइन

सामान्य जनतेचे काम करणे हेच लोकप्रतिनिधींचे काम असते. जनता काम करणा-या लोकप्रतिनिधींना निश्चितच न्याय देते. शहराला स्मार्ट सिटी करण्याबरोबरच शहराचा वारकरी सांप्रदायायिक वारसा जपण्याचे काम आपण करू. तसेच शहराच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वांना बरोबर घेऊन राजकारण बाजूला ठेवून काम करण्याची ग्वाही महापौर राहुल जाधव यांनी दिली.

[amazon_link asins=’B07676K2K2,B07F8FCDWS’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’e00faa8f-ba3b-11e8-b35e-6d24c06b1306′]

आकुर्डी काळभोरनगर येथील वारकरी शिल्पाचे उद्‌घाटन महापौर राहुल जाधव यांच्या हस्ते रविवारी (16 सप्टेंबर) करण्यात आले. या वेळी स्थानिक नगरसेविका वैशाली काळभोर, मिनल यादव, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील, विरोधी पक्षनेते दत्ता साने, ज्येष्ठ नगरसेवक विठ्ठल नाना काटे, राजू मिसाळ, नगरसेविका डॉ. वैशाली घोडेकर, सुलक्षणा धर, संगीता ताम्हाणे, गीता मंचरकर, माजी नगरसेविका भारती फरांदे, माजी नगरसेवक राजू दुर्गे, शंकर पांढरकर, प्रसाद शेट्टी, राष्ट्रवादी युवकशहराध्यक्ष विशाल वाकडकर, विशाल काळभोर, उद्योजक शंकर काळभोर, जालिंदर काळभोर, तुळशीराम काळभोर, मुकुंद काळभोर, समीर काळभोर, संजय जगताप,शिक्षण मंडळाचे माजी अध्यक्ष विजय लोखंडे, फजल शेख, मूर्तीकार योगेश कुंभार आदी उपस्थित होते.

घर बसल्या नोंदविता येणार एफआयआर

महापौर राहुल जाधव म्हणाले की, देहू पंढरपूर वारीचा दुसरा मुक्काम आकुर्डी येथे असतो. आकुर्डीत वारक-यांचे प्रातिनिधिक स्वागत करणारे हे शिल्प आहे. माननीयन्यायालयाच्या निर्णयाचा आदर राखून गणपती मंडळांना बक्षीसांचे वाटप करू, अशीही ग्वाही यावेळी महापौर जाधव यांनी दिली.

वाघेरे पाटील म्हणाले की, कै. सुनील दुर्गे चौकाचे सुशोभिकरण करणे आणि वारकरी शिल्प उभारण्याकामी स्थानिक नगरसेविका वैशाली काळभोर यांनी यशस्वीपाठपुरावा केला. त्यांच्या प्रयत्नातूनच उभारण्यात आलेले हे शिल्प शहराच्या सौंदर्यात भर घालत आहे. मीनल यादव व राजू दुर्गे यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक वैशाली काळभोर यांनी केले. सुत्रसंचालन दीपक साकोरे यांनी केले. आभार खंडेराव काळे यांनी मानले.