शिवसेनेत जाण्याबाबत एकनाथ खडसे म्हणाले…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – भाजपमध्ये नाराज असलेले ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे शिवसेनेच्या वाटेवर असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती. कालच एकनाथ खडसेंनी आदित्य ठाकरेंची भेट घेतली होती. यानंतर संजय राऊतांनीही म्हटलं होतं की, खडसे नेहमीच आमच्या संपर्कात असतात. त्यांच्या या विधानानंतर आता खडसे शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू झाली होती. खडसे महाआघाडीच्या सरकारमध्ये प्रवेश करून मंत्रीपद मिळवणार असल्याचंही बोललं जात होतं. या सगळ्यावर प्रतिक्रिया देत खुद्द एकनाथ खडसेंनीच याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे.

शिवसेनेत जाण्याचे वृत्त फेटाळत एकनाथ खडसे म्हणाले, “मी भाजपमध्ये आहे. शिवसेनेत जाण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.” आपली प्रतिक्रिया देताना त्यांनी हेही सांगितले की, आदित्य ठाकरेंनी त्यांना शपथविधी सोहळ्याला निमंत्रण दिले आहे. ते भाजपमध्येच आहेत असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.

एकनाथ खडसेंनी काल भाजपला घरचा आहेर दिला होता. त्यांनी म्हटलं होतं की, पक्षातील वरिष्ठ नेत्यांची तिकीटं कापल्यानं, त्यांना विश्वासात न घेतल्यानं भाजपला सत्ता गमवावी लागली. सर्वांना सोबत घेऊन निवडणूक लढवली असती तर 25 जागा वाढल्या असत्या.” अशी नाराजी त्यांनी व्यक्त केली होती. इतकेच नाही तर अजित पवारांविरोधातील सिंचन घोटाळ्याचे बैलगाडीभर पुरावे आपण रद्दीत विकल्याचंही त्यांनी सांगितलं होतं.

Visit : Policenama.com