सिंहगड रस्त्यावर वाईन शॉप फोडले

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – शहरातील बंद घरांसोबतच चोरटे आता दुकाने फोडू लागली असून, सिंहगड रोड परिसरात चोरट्यांनी वाईन शॉप फोडून दारूच्या बाटल्या पळविल्याचा प्रकार समोर आला आहे.

याप्रकरणी तुषार इंगळे (वय 29, रा. इंगळे कॉलनी, उत्तमनगर) यांनी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे नर्‍हे आंबेगाव परिसरात नवले हॉस्पीटलच्या पाठिमागील बाजूस हिरो वाईन शॉप हे दुकान आहे.

दरम्यान, बुधवारी रात्री चोरट्यांनी शटरचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. तसेच, गल्ल्यातील 15 हजाराची रोकड आणि दारूच्या बाटल्या असा एकूण 66 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. अधिक तपास सिंहगड रोड पोलीस करत आहेत.

घराला गेट केल्यावरून एकाला बेदम मारहाण

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –
घराच्या समोरील बाजूस सार्वजनिक रस्त्यावर गेट केल्यावरून एका नागरिकाला महिला व पुरूषांनी बेदम मारहाण केल्याची घटना चतु:श्रृंगी परिसरात घडली आहे. याप्रकरणी नामदेव सायकर (वय. 45) यांनी फिर्याद दिली आहे.

त्यानुसार, तीन महिलांसह सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे बाणेर परिसरातील म्हाळुंगे रस्त्यावर घर आहे. रस्त्याला लागून घर असल्याने त्यांनी दारासमोर लोखंडी गेट तयार केले होते. यावरून आरोपींनी त्यांच्यासोबत वाद घातला. तसेच, त्यांना शिवीगाळकरून काठी तसेच सुरीने बेदम मारहाणकरून जखमी केली आहे. अधिक तपास सहायक निरीक्षक दहिफळे हे करत आहेत.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/