वाईन्स शॉपच्या मालकिणीला अडवून गोळीबार

कोपरगाव : पोलीसनामा ऑनलाइन – दुकानातील पैसे घेऊन जाणाऱ्या महिलेला रस्त्यात अडवून दोघा हल्लेखोराने हवेत गोळीबार करण्याचा धक्कादायक प्रकार बुधवारी रात्री घडला. मात्र, गोळीबाराचा आवाज ऐकून लोक धावत येत असल्याचे पाहून हल्लेखोरांनी पळ काढला. त्यामुळे महिलेला लुटण्याचा त्यांचा प्रयत्न फसला. ही घटना धारणगाव रोडवर बुधवारी रात्री ११ वाजता घडली.

याबाबत पोलिसांनी सांगितले की, धारणगाव रोडवर माला धोगडी यांचे किशोर वाईन्स हे दुकान आहे. नेहमीप्रमाणे रात्री त्यांनी दुकान बंद करुन दिवसभराची जमा झालेली रक्कम बरोबर घेऊन त्या दुचाकीवरुन घरी निघाल्या. त्या खुले नाटयगृहजवळील रस्त्यावर आल्या असताना मोटारसायकलवरुन दोघे जण आले व त्यांनी धोगडी यांना अडविले. त्यांना धाक दाखविण्यासाठी त्यांच्यातील एकाने आपल्याकडील पिस्तुलातून हवेत गोळीबार केला. मात्र, त्याचा उलटाच परिणाम झाला. रात्रीच्या शांत वातावरणात गोळीबाराचा आवाज ऐकून आसपासचे लोक धावत त्यांच्या दिशेने येऊ लागले. लोकांना येताना पाहून दोघा हल्लेखोरांनी पळ काढला. त्यामुळे धोगडी यांना लुटण्याचा त्यांचा प्रयत्न फसला. पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाकचौरे यांनी घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली. पोलीस हल्लेखोरांचा शोध घेत आहेत.

 घोरण्याच्या समस्येवर ‘या’ ६ घरगुती उपायांनी ‘कंट्रोल’ करा

बकरीच्या दुधाचे ‘हे’ आहेत आश्चर्यचकित करणारे फायदे, जाणून घ्या

नेहमीच आद्रक चहा पिणे योग्य नाही ; होऊ शकतो ‘हा’ त्रास

 ‘सीसी क्रीम’ म्हणजे काय ? याचा वापर केल्यामुळे होतात फायदे आणि नुकसान

 ‘हे’ फळं खा आणि मधुमेहावर नियंत्रण मिळवा

 कच्ची पपई खाल्याने होतात ‘हे’ ३ फायदे, जाणून घ्या

Loading...
You might also like