विंग कमांडर अभिनंदन यांना पाकिस्तानात विचारण्यात आले ‘हे’ प्रश्न 

नई दिल्ली : वृत्तसंस्था – सीमेपलीकडून पाकिस्तानच्या कुरापती सुरूच आहेत. वारंवार शस्त्रसंधीचे उल्लंघन केले जात आहे. पाकिस्तानच्या F-16 विमानाला परतवून लावताना भारतीय वायुसेनेचे विमान पाकिस्तानच्या हद्दीत क्रॅश झाले. भारतीय वायुसेनेचे कमांडर अभिनंदन पाकिस्तानच्या धर्तीवर होते. त्यांची सुटका जरी पाकिस्तानातून झाली असली तरी पाकिस्तानात नेमकं त्यांच्यासोबत काय झालं ? त्यांच्यासोबत कसा व्यवहार करण्यात आला होता ? असे प्रश्न प्रत्येकाच्याच मनात आहे. यासंदर्भातले वृत्त एका प्रसिद्ध इंग्रजी वृत्तपत्राने दिली आहे.

या वृत्तपत्राने दिलेल्या महितीनुसार

–अभिनंदन यांच्या टीमच्या एका मेंबर ने सांगितले आहे की,

–पाकिस्तानी सैनिकांनी अभिनंदन यांना खूप मारहाण केली. त्यांना झोपू दिले नाही.
–पाकिस्तानच्या ताब्यात असताना अभिनंदन यांना सलग उभे राहण्यास सांगण्यात आले होते.
–त्यांची अस्वस्थता वाढवण्याकरिता मोठ्या आवाजात गाणी लावण्यात येत होती.
–यावेळी पाकिस्तानी सैनिकांनी विंग कमांडर अभिनंद वर्तमान यांच्याकडून भारतीय सैन्याची तुकडी, उच्च सुरक्षेसाठी वापरण्यात येणाऱ्या रेडिओ फ्रिक्वेंसी आणि संवेदनशील लॉजिस्टिक विषयाशी माहिती काढून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला.

यावेळी अभिनंदन यांच्या टीमच्या ऑफिसर ने सांगितले की, संपूर्ण भारतीय फायटर वैमानिकांना जोपर्यंत शक्य आहे तोपर्यंत गोपनीयता पाळण्याचे ट्रेनींग दिले जाते. जेणेकरून वायुसेना तैनात असलेल्या आपल्या एयरक्राफ्ट आणि योजनांमध्ये २४ तासात बदल करू शकेल आणि त्यामुळे विरोधी त्याचा फायदा घेऊ शकत नाही.