भारताचा मोठा विजय : ‘रियल लाईफ हिरो’ विंग कमांडर अभिनंदन भारतात परतला

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अखेर भारतीय कूटनीतीचा विजय झाला. पाकिस्तानच्या ताब्यात असेलेले भारतीय विंग कमांडर अभिनंदन वर्थमान यांची पाकिस्तानातून सुटका करण्यात आली. यावेळी हजारो भारतीयांसोबत अभिनंदन यांचे आई वडील देखील वाघा बॉर्डर वर त्यांची वाट पाहत होते. अभिनंदन भारताच्या हद्दीत येण्याचा तो क्षण अतिशय भावूक आणि आनंददायी होता. यावेळी उपस्थितांमध्ये एकच जल्लोष करण्यात आला.

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी गुरुवारी अभिनंदन यांच्या सुटके संदर्भांत घोषणा केली होती. अभिनंदन यांना वाघा बॉर्डर वरुन भारतात पाठवण्यात आले. पाकिस्तानात ते इस्लामाबाद येथे होते त्यानंतर त्यांना लाहोर येथे आणण्यात आले. त्यानंतर वाघा बॉर्डर वरून त्यांना भारतात सोडण्यात आले. अभिनंदन यांची आज सुटका करण्यात आली.

‘बीटिंग द रिट्रीट’ चा आजचा सोहळा रद्द करण्यात आला होता. मात्र यावेळी अभिनंदन यांच्या सुटकेची ऐतिहासिक घटना येथे पाहायला मिळाली. यावेळी बीटिंग रिट्रीट मध्ये नागरिकांना प्रवेश देखील देण्यात आला नव्हता. यावेळी ढोल ताशांच्या गजरात अभिनंदन यांचे स्वागत करण्यात आले.

अभिनंदन यांच्यासोबत नक्की काय झाले ?
पुलवामा हल्ल्यानंतर देशवासियांमध्ये पुलवामा हल्ल्याचा बदला घेण्याची मागणी होती. अखेर 26 फेब्रुवारीच्या पहाटे भारताने अतिशय चालाखपणे अतिरेक्यांचे तळ उध्वस्त केले. यात 350 अतिरेक्यांचा खात्मा करण्यात आला. त्यानंतर पाकिस्तानातून देखील LOC जवळ भारतात घुसखोरीचे प्रयत्न झाले. वेळोवेळी भारताने त्यांना मुहतोड जवाब दिला.
बुधवारी पाकिस्तानकडून घुसखोरी करण्यात आलेले  F-16 या विमानाला परतवून लावताना भारतीय वायुसेनेकडून विमानांनी उड्डाण भरले होते. यात मिग -21 या विमानाचा सामावेश होता. यापैकी एकूण तीन विमानांपैकी एक विमान भारतात परतले नाही. हे विमान पाकिस्तानच्या हद्दीत जाऊन पडले. या विमानात भारतीय वायुसेनेचे विंग कमांडर अभिनंदन वर्थमान यांना पाकिस्तानने ताब्यात घेतले. अभिनंदन यांचे व्हिडीओ, फोटो पाकिस्तानकडून व्हायरल करण्यात आले. भारताने जिनिव्हा करारानुसार भारतीय कमांडर अभिनंदन यांना सुरक्षित भारतात सोडण्याची मागणी केली आहे. त्यानुसार अभिनंदन यांना भारतात पाठवण्याची घोषणा गुरुवारी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी केली. अखेर आज अभिनंदन यांना भारतात सोडण्यात आले.