Post_Banner_Top

धक्कादायक… #AirStrike नंतर भारतीय वायुदलाच्या ‘त्या’ विंग कमांडरची आत्महत्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतीय वायु दलाच्या विंग कमांडरने आत्माहत्या केल्याची घटना समोर आली आहे. उत्तर प्रदेशच्या प्रयागराजमध्ये त्यांनी आत्महत्या केल्याचे समजत आहे. अरविंद सिन्हा असं या विंग कमांडरचं नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी (दि- 26 फेब्रुवारी) त्यांनी स्वत:वर गोळी झाडत आत्महत्या केल्याचे समजत आहे. आपल्या दोन पायांमध्ये डबल बॅरल बंदुक अडकवली आणि गळ्यावर गोळी झाडून घेत त्यांनी स्वत:चे जीवन संपवले. प्रयागराजमध्ये असलेल्या एअरफोर्स कॉलनीत त्यांनी आत्महत्या केली आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, अरविंद सिन्हा यांनी मंगळवारी 8 वाजण्याच्या सुमारास स्वत:वर गोळी झाडत आत्महत्या केली. सिन्हा हे सेंट्रल एअर विभागाचे जनसंपर्क अधिकारी म्हणून कार्यरत होते. दरम्यान कौटुंबिक वादामुळे त्यांनी आत्महत्या केली असावी असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. मुख्य म्हणजे, त्यांनी केलेल्या आत्महत्येमागचे कारण अद्याप समजू शकले नाही. विशेष म्हणजे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिन्हा यांच्या मृतदेहाजवळ कोणतीही चिठ्ठी मिळालेली नाही त्यामुळे यामागचे कारण तूर्तास तरी समोर आलेले नाही.
त्यांच्या आत्महत्येची माहिती मिळताच पोलीस त्वरीत घटनास्थळी दाखल झाले. या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली असून आश्चर्य व्यक्त होताना दिसत आहे. कारण काल भारतीय हवाई दलाने पाकव्याप्त काश्मीरमध्ये असणारे जैश-ए-मोहम्मदचे दहशतवादी अड्डे उध्वस्त करत जैशचे अनेक मोठे कमांडर तसेच मसद अजहर याचे दोन भाऊ आणि मेहुणा यांचा खात्मा केला आहे. हल्ल्याच्या तयारीत असणाऱ्या आणि दहशतवादाची ट्रेनिंग घेणाऱ्या तब्बल 350 दहशतवाद्यांचाही वायु दलाने खात्मा केला आहे. आणि अशातच आता वायुदलाच्या विंग कमांडरच्या आत्महत्येची घटना समोर येणे ही एक विचार करण्यासारखी गोष्ट आहे. त्यांच्या आत्महत्येमुळे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहे.
Loading...
You might also like