कॅन्सरसोबत लढाई जिंकली परंतु ‘कोरोना’कडून पराभव ! ‘दिग्गज’ अमेरिकन स्क्रीन रायटर ‘टेरेंस मॅकनली’चं निधन

पोलीसनामा ऑनलाईन : कोरोना व्हायरसमुळं जगभरात दहशतीचं वातावरण आहे. अशात आता एंटरटेंमेंट वर्ल्डमधून एक वाईट बातमी समोर आली आहे. दिग्गज अमेरिकन स्क्रीन रायटर टेरेंस मॅकनली (Terrence McNally) यांचं कोरनाची लागण झाल्यानं निधन झालं आहे. वयाच्या 81 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

फ्लोरिडाच्या रुग्णालयात मंगळवार(दि 24 मार्च 2020 रोजी) टेरेंस मॅकनलींनी जगाचा निरोप घेतला. टेरेंसचा प्रतिष्ठीत समजल्या जाणाऱ्या एमी आणि टोनी अवॉर्ड्सनं सन्मान झालेला आहे. टेरेंसच्या प्रवक्त्यानं जारी केलेल्या स्टेटमेंटमध्ये सांगण्यात आलं आहे की, टेरेंस लंग्स कॅन्सरचे सर्व्हाईवर होते. त्यांच्या निधनाची बातमी समोर आल्यानंतर फॅन्स आणि सेलिब्रिटी साऱ्यांनाच धक्का बसला. ही बातमी समोर आल्यानंतर सर्वांनीच दु:ख व्यक्त केलं. ब्रिटीश अॅक्टर आणि कॉमेडियन जेम्स कॉर्डननं दु:ख व्यक्त करत म्हटलं की, ते खरचं एक जेंटलमन होते. थिएटरप्रति त्यांची कमिटमेंट पाहण्यासारखी होती. त्यांना खूप मिस केलं जाईल.

टेरेंस यांना The Bard of American Theater असंही म्हटलं जातं. त्यांचं इंडस्ट्रीत 60 वर्षांचं करिअर होतं. त्यांचे प्ले ओपेरा आणि म्युझिकल्स जगभरात सादर केले जातात. टेरेंस प्रेम, एड्स, होमोफोबिया अशा कंटेटवर लिहायचे. लव वैलोर कंपॅशन, मास्टर क्लास अशे त्यांचे काही प्ले सांगता येतील. किस ऑफ द स्पायडरवुमनस, रॅगटाईम अशी त्यांची काही पुस्तकं आहेत.

https://www.instagram.com/p/B-JEdO3pZNx/