Leaderराजकीयविधानसभा 2019

कर्जत-जामखेडमध्ये झळकतोय रोहित पवारांच्या विजयाचा ‘फ्लेक्स’

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – विधानसभा निवडणुकीचा निकाल लागण्याअगोदरच राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे नेते रोहित पवार यांच्या अतिउत्साही कार्यकर्त्यांनी त्यांचे फलक लावले आहेत. कर्जतमधील मुख्य रस्त्यावर लागलेला हा फलक चर्चेचा विषय ठरला आहे.

कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघातून शरद पवार यांचे नातू रोहित पवार हे मंत्री राम शिंदे यांच्याविरोधात निवडणूक लढत असल्याने संपूर्ण राज्याचे लक्ष या मतदारसंघाकडे लागले होते. उद्या सकाळी मतमोजणीला सुरुवात होणार आहे. त्याअगोदरच रोहित पवार समर्थकांनी अतिउत्साहीपणा दाखवून लावून विजयी फलक लावण्यास सुरुवात केली आहे. कर्जत शहरातील मुख्य रस्त्यावर लावलेला रोहित पवार यांचा विजयी फलक शहरात चांगलाच चर्चेचा विषय ठरला आहे.

या फलकाला कर्जत नगरपंचायत प्रशासनाने परवानगी दिली होती का? निकाल लागण्याअगोदरच परवानगी कशी मिळू शकते, असाही प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे.

Visit : Policenama.com

 

 

Back to top button