Winter Care | हिवाळ्यात मुलांची घ्या विशेष काळजी, जाणून घ्या कसे ठेवावे गरम आणि आजारांपासून सुरक्षित

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Winter Care | थंडीचा हंगाम सुरू झाला असून थंड वार्‍यापासून बचाव करण्यासाठी लोकांनीही आपले उबदार कपडे बाहेर काढले आहेत. या ऋतूमध्ये प्रत्येकाने स्वतःची काळजी घेणे आवश्यक असते, परंतु या काळात मुलांची काळजी घेणे सर्वात महत्त्वाचे असते. (Winter Care)

 

अनेकदा मुले हिवाळ्यात ताप, सर्दी, फ्लू (Fever, Cold, Flu) यासारख्या आजारांना बळी पडतात. सर्वात चिंतेची बाब म्हणजे सध्या कोरोनाचा ओमिक्रॉन व्हेरिएंट (Omicron variant) सुद्धा आपला कहर दाखवत आहे. अशा स्थितीत मुलांची सर्वात जास्त काळजी घेण्याची गरज असते. पण असे काही उपाय आहेत ज्याद्वारे मुलांना थंडीसोबतच या आजारांपासून सहज वाचवता येते. (Winter Care)

 

थंडी आणि आजारांपासून मुलांचे असे करा रक्षण

भरपूर पोषण द्या :
व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन डी आणि झिंक (Vitamin C, Vitamin D, Zinc) यांसारखे पोषक घटक शरीराला आतून उबदार ठेवण्यास मदत करतात. हिवाळ्यात मुलांना असा आहार दिला पाहिजे, ज्यामध्ये त्यांना हे पौष्टिक घटक मुबलक प्रमाणात मिळतील. बाजरीची भाकरी, सुका मेवा, गूळ, अंडी (Millet Bread, Dry Fruits, Jaggery, Eggs) यांचे सेवन हिवाळ्यात शरीराला उबदार ठेवण्यास मदत करते, त्यामुळे मुलांना हे पदार्थ खाऊ घाला.

उबदार कपडे घाला :
हिवाळ्याच्या हंगामात मुलांना उबदार ठेवण्यासाठी, त्यांना उबदार कपडे घालणे आवश्यक आहे. परंतु लक्षात ठेवा की त्यांनी प्रौढांपेक्षा उबदार कपड्यांचा एक थर जास्त घाला. कपडे घातल्यानंतर आतून तपासा की ते जास्त घट्ट होत नाहीत ना.

 

स्वच्छतेची काळजी घ्या
हिवाळ्यात मुलांना निरोगी ठेवण्यासाठी, त्यांना स्वच्छ ठेवणे आवश्यक आहे. हिवाळ्यातही मुलांना हात धुण्याची सवय लावा.
त्यांच्या कपड्यांच्या स्वच्छतेची विशेष काळजी घ्या. मुलांना रोज आंघोळ करायची नसेल तर दोन दिवसांनी आंघोळ घाला आणि आठवड्यातून एकदा त्यांचे डोके धुवा.

 

मुलांना द्रव पदार्थ द्या :
हिवाळ्यात अनेकदा लोक कमी पाणी पितात, अशा स्थितीत शरीरात पाण्याची कमतरता निर्माण होते.
परंतु मुलांच्या शरीरातील पाण्याची कमतरता भरून काढण्यासाठी त्यांना द्रवपदार्थ प्यायला लावा.
त्यांना सकाळी प्यायला कोमट पाणी द्या. याशिवाय त्यांना गाजराचा रस आणि सूपही देता येईल.

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही.
त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Winter Care | take special care of children in winter know how to keep warm and safe from diseases

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

MLA Bachchu Kadu | आधी लोकांचे खिशे कापायचे आणि नंतर किराणा वाटायचा, बच्चू कडूंची नवनीत राणावर टीका

Maharashtra Police | मनसेचे गृहमंत्री फडणवीसांना पत्र, पोलिस बांधवांनाही दिवाळी बोनस द्या

Gold Price Today | दिवाळी-धनत्रयोदशीपूर्वी सोने स्वस्त, चांदीची चमक वाढली, जाणून घ्या आजचे दर