इम्यूनिटी वाढवते, कोथेंबिर-पुदीन्याची चटणी, अशी बनवली तर लोक विचारतील काय आहे Recipe

पोलिसनामा ऑनलाईन – Dhaniya Pudina Chutney : जेवणासोबत वाढलेली चटणी जेवणाचा स्वाद वाढवते. अशाच एका चटणीचे नाव आहे कोथेंबिर पुदीना चटणी. ही चटणी टेस्टी आहेच, शिवाय तिच्या सेवनाने अनेक आजारसुद्धा दूर होतात. कोथेंबिर आणि पुदीन्यात अनेक मायक्रो मिनरल जसे की, कॅल्शियल, पोटॅशियम, मॅग्निशियम इत्यादी असते, जे इम्यूनिटी बूस्टरचे सुद्धा काम करते. ही टेस्टी चटणी कशी बनवतात ते जाणून घेवूयात…

कोथेंबिर-पुदीना चटणीचे साहित्य
– पुदीना आणि कोथेंबिरची पाने अर्धा-अर्धा कप
– लसूण पाकळ्या 4-5
– आले 1 तुकडा
– कच्ची कैरी -1
– हिरवी मिरची, चवीनुसार
– मीठ चवीनुसार
– जीरे अर्धा चमचा
– काळे मीठ चवीनुसार

कृती –
सर्वप्रथम पुदीना आणि कोथेंबिर धुवून घ्या. यानंतर यामध्ये सर्व साहित्य मिसळून मिक्सरमध्ये वाटून घ्या. ही चटणी हवी तशी घट्ट किंवा पातळ करू शकता.

हे आहेत आरोग्यदायी फायदे
1 इम्यूनिटी वाढते
2 अँटी-बॅक्टीरियल गुणांमुळे पोट निरोगी राहते.
3 आतड्यांच्या समस्या दूर होतात.
4 ताप आणि अतिसारात लाभदायक आहे.