Winter Diet | जाणून घ्या कशाप्रकारे हिवाळ्यात त्वचेसाठी लाभदायक ठरू शकतो पेरू!

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Winter Diet | एकीकडे थंडीमुळे उष्णतेपासून दिलासा मिळत असला तरी त्यामुळे अनेक संसर्गजन्य आजारही होतात. त्यामुळे हिवाळ्यात हिरव्या भाज्या आणि हंगामी फळे खाण्याचा सल्ला दिला जातो, जेणेकरून काळात आजारांपासून स्वत:ला सुरक्षित ठेवू शकता. यापैकी एक फळ म्हणजे पेरू (Guava), जे हिवाळ्यात येते आणि सर्वांनाच आवडते. (Winter Diet)

 

पेरू हे हिवाळ्यात येणारे सर्वात स्वादिष्ट आणि लोकप्रिय फळ आहे. हे गोड फळ न आवडणारा क्वचितच कोणी असेल. पेरू केवळ चवीलाच नव्हे, तर पोषक तत्वांनीही परिपूर्ण आहे. पोषणतज्ञांच्या मते, पेरूमध्ये कमी ग्लायसेमिक इंडेक्स (GI) असतो ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत होते. याव्यतिरिक्त, तो हार्मोनल संतुलन राखण्यात आणि हृदयाचे आरोग्य चांगले ठेवण्यास देखील मदत करतो. (Winter Diet)

 

पेरू त्वचेच्या आरोग्यासाठीही फायदेशीर आहे. त्वचेसाठी पेरू कसा फायदेशीर ते जाणून घेवूयात :

पेरूमध्ये व्हिटॅमिन सी, आयसोफेन आणि अँटिऑक्सिडंट्स भरपूर असतात, ज्यामुळे तरुण आणि पोषित त्वचा मिळण्यास मदत होते. याव्यतिरिक्त, पेरू हे पाण्याने समृद्ध फळ आहे, जे त्वचेतील पाण्याचे संतुलन राखण्यास, म्हणजेच ती हायड्रेटेड आणि तरुण ठेवण्यास मदत करते.

पेरूचे आरोग्यदायी फायदे (Health benefits of Peru)

1. पेरू इम्युनिटी वाढवण्यास मदत करतो.
2. पेरूमध्ये ’अँटी-एजिंग’ गुणधर्म भरपूर आहेत.
3. डायबिटिज रुग्णांसाठी पेरू लाभदायक फळ आहे.
4. पेरू हृदयाच्या आरोग्यास उपयोगी आहे.

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही.
त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Winter Diet | know how guava helps promote healthy skin in winters

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Daibetes – Milk | डायबिटीजमध्ये दूध प्यायल्याने रुग्णांची ब्लड शुगर वाढू शकते का? जाणून घ्या काय आहे सत्य

Winter Care | हिवाळ्यात मुलांची घ्या विशेष काळजी, जाणून घ्या कसे ठेवावे गरम आणि आजारांपासून सुरक्षित

Health Tips | जेवल्यानंतर ताबडतोब झोपण्याची सवय आहे का? मग व्हा सावध! होऊ शकतात हे गंभीर आजार