बाजारात खूप स्वस्त मिळतेय ‘ही’ भाजी, खाल्ल्याने कॅन्सर, हृदयरोग, लठ्ठपणा राहतो दूर ; वाढते रोगप्रतिकारशक्ती

पोलीसनामा ऑनलाइन –हिवाळा सुरू झाला आहे आणि बाजारात अनेक प्रकारच्या नव्या भाज्या मिळू लागल्या आहेत. यापैकी एक भोपळासुद्धा आहे. बहुतांश लोक भोपळ्याची भाजी करतात. ही एक अशी भाजी आहे, जी अनेक गंभीर आजारांपासून वाचवू शकते. तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल की, एक कप भोपळ्यात 2.5 पट जास्त व्हिटॅमिन असतात. याचे नियमित सेवन केल्याने कॅन्सर, लठ्ठपणा, कमजोर इम्यून सिस्टिमपासून बचाव होऊ शकतो. भोपळ्याचे फायदे जाणून घेऊयात.

हे आहेत फायदे

1 कॅन्सरपासून बचाव करण्यास मदत
यात कॅरोटीनॉयड आढळते जे एक अँटिऑक्सिडेंटचे काम करते. हे फ्रीरॅडिकलचा परिणाम दूर करते, जे कॅन्सरच्या पेशी वेगाने वाढवण्याचे काम करते. गॅस्ट्रिक, ब्रेस्ट आणि अग्नाशयाच्या कॅन्सरच्या जोखीमशी हे संबंधित आहे.

2 वजन कमी करण्यासाठी उपयोगी
भोपळ्यात व्हिटॅमिन ए, सी, आणि ई, पोटॅशियम, आयर्न आणि अनेक पोषकत्व असतात. याशिवाय भरपूर पाणी असते. कॅलरी कमी असतात. यामुळे फॅटची भीती नसते. डायरी फायबरचा मोठा स्राेत आहे. ज्यामुळे भूख कमी होते.

3 इम्यून सिस्टिम मजबूत होते
यातील व्हिटॅमिन ए आणि सी इम्यून सिस्टिम मजबूत करते.

4 दृष्टी मजबूत होते
यातील व्हिटॅमिन ए मुळे डोळ्यांची दृष्टी मजबूत होते.

5 हृदय निरोगी राहाते
उच्च रक्तदाब हृदयरोगाचा कारक आहे. भोपळ्यात पोटॅशियम असते जे रक्तदाब नियंत्रणात ठेवते. स्ट्रोकची जोखीम कमी करते. यातील तत्त्व रक्तात गुठळ्या होऊ देत नाही.

6 त्वचा राहते निरोगी
कॅरोटीनॉयड त्वचेला उन्हाच्या दुष्परिणामापासून वाचवते. व्हिटॅमिन सी शरीरासाठी कोलेजनची निर्मिती करण्यासाठी आवश्यक आहे. काही अन्य पोषकतत्व त्वचेला यूवी लाइटपासून वाचवतात, ज्यामुळे सुरकुत्या पडत नाहीत.