महाराष्ट्रातील ‘हिवाळा’ संपत आला : पुणे वेधशाळा

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – महाशिवरात्रीपासून वातावरणात बदल दिसू लागला असून दुपारच्या वेळी उन्हाचा तडाखा जाणवू लागला आहे, अगदी पहाटे मात्र गारवा जाणवतो. पुणे वेधशाळेने दिलेल्या अंदाजानुसार वातावरणातील हा बदल झपाटयाने होत जाईल आणि संपूर्ण महाराष्ट्रात लवकरच हिवाळा संपेल.

होळी जळाली थंडी पळाली, असे म्हटले जाते, परंतु यंदा होळीपूर्वी थंडी पळेल. कोकण भागात आताच तापमान ३५ अंश आणि त्यापुढे आहे. मध्य महाराष्ट्रातही कमाल तापमान वाढू लागले आहे. सध्या उत्तर महाराष्ट्रात मात्र १३ते १५ अंश सेल्सिअस तापमान असल्याने गारठा अनुभवावा लागतो आहे. यंदा कडाक्याची थंडी फार काळ पडली नाही, त्याचा आंबा पिकावर परिणाम होण्याची शक्यता आहे.