Winter Foods | हिवाळ्यात शरीर आतून ठेवायचे असेल गरम? रोज खा हे 3 फूड्स, थंडीपासून होईल रक्षण

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Winter Foods | सध्या थंडीचा मोसम सुरू आहे, अशा वेळी थोडा निष्काळजीपणा केल्यास आजार सहज घेरतात. या ऋतूमध्ये सर्दी, घसा खवखवणे, नाक वाहणे, ताप येणे असे आजार होतात. अशावेळी जर तुम्हाला जास्त सर्दी होऊ नये आणि तुम्ही निरोगी राहावे असे वाटत असेल तर तुम्ही आहारात काही गोष्टींचा समावेश केलाच पाहिजे. होय, असे काही पदार्थ (Winter Foods) आहेत, जे हिवाळ्यातही तुम्हाला आतून उबदार ठेवण्याचे काम करतात. यासोबतच या गोष्टींचे रोज सेवन केल्यास वारंवार आजारी पडत नाही (Foods That Keep Body Warm).

 

हिवाळ्यात या पदार्थांचे सेवन केल्याने शरीर आतून राहते उबदार

१. तूप सेवन करा –
जर तुम्हाला हिवाळ्यात निरोगी राहायचे असेल तर तुपाचे सेवन अवश्य करा. ते शरीराला आतून उबदार ठेवण्याचे काम करते. कारण यामध्ये मीडियम चेन फॅटी अ‍ॅसिड असते. लिव्हरला एनर्जी देण्यासाठी ते थेट बर्न होते. तुपात, विशेषत: ब्युटीरिक अ‍ॅसिडदेखील असते, जे अन्न सहज पचण्यास मदत करते आणि रोग प्रतिकारशक्तीदेखील वाढवते.

 

२. तीळ –
तिळात भरपूर फायबर असते. ज्यामुळे पचनक्रिया बरोबर राहते आणि बद्धकोष्ठता आणि सूजची समस्या दूर होते. अशावेळी शरीराला आतून उबदार ठेवायचे असेल तर तिळाचे सेवन अवश्य करा. यासाठी तुम्ही ते सॅलडवर टाकूनही खाऊ शकता. (Winter Foods)

३. हर्बल टी प्या –
जर तुम्ही हिवाळ्यात वारंवार आजारी पडत असाल तर तुम्ही आले, ज्येष्ठमध आणि तुळस यांचा हर्बल टी घेऊ शकता. हा चहा हिवाळ्यातही तुम्हाला आतून उबदार ठेवण्याचे काम करतो.

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही.
त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Winter Foods | health tips eat these foods daily to keep the body warm from inside in winter

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Winter Session -2022 | महाविकास आघाडीची आजही ईडी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी…

Rashmika Mandanna | रश्मिका मंदानाचा ‘तो’ व्हिडीओ होतोय चांगलाच ट्रोल; चाहते म्हणाले…

Sanjay Raut | देवेंद्र फडणवीस यांच्या ‘त्या’ दाव्यावर संजय राऊतांचा खोचक टोला, म्हणाले-‘नैरोबी-केनियाला देखील… ‘