Winter foods to boost immunity : थंडीत इम्यून सिस्टम स्ट्राँग करून संसर्गाशी लढण्यासाठी ‘या’ 7 गोष्टींचं करा सेवन

पोलीसनामा ऑनलाइन – थंडीच्या काळात इम्यूनिटी सिस्टम कमजोर होण्याचा सर्वात मोठा धोका असतो. या कारणामुळे लोकांना सर्दी, खोकला, फ्लू, घशात खवखव, ताप आणि संसर्ग ताबडतोब होतो. सध्या कोरोना संकटसुद्धा सुरू आहे आणि हा व्हायरस कमजोर लोकांना लवकर बाधित करतो, अशावेळी जरूरी आहे की, शरीर आतून मजबूत केले पाहिजे.

या हवमानात संसर्गमुक्त राहण्यासाठी डाएटमध्ये बदल करणे जरूरी आहे. आम्ही आपल्याला थंडीत सेवन करण्यासाठी काही आवश्यक खाद्य पदार्थांबाबत सांगणार आहोत, जे सेवन केल्याने थंडीत इम्यूनिटी सिस्टम मजबूत करणे आणि रोगापासून वाचण्यास मदत होऊ शकते.

1 तूप
डाळ आणि भाजीसोबत जेवण बनवताना तेल म्हणून तूपाचा वापर करू शकता. तून शरीर आतून गरम ठेवणे, तसेच फॅटमध्ये मिसळणारे व्हिटॅमिन ए, बी आणि के शोषण वाढवण्यास मदत करते.

2 बाजरी
बाजरीची भाकरी आणि लाडू बनवून खाऊ शकता, तसेच थालीपीठमध्ये बाजरीचे पीठ वापरता येते. हे मांसपेशी मजबूत करते. केसांची वाढ होते आणि व्हिटॅमिन बी यामध्ये भरपूर असते.

3 कंद भाज्या
गाजर, बीट, मुळा, थंडीत आपल्य आहारात समावेश करा. हे आतड्यांना प्रोबायोटिक प्रदान करते. वजन कमी करण्यात मदत करते. पचनशक्ती सुधारते. त्वचेला चांगले पोषण मिळते.

4 तिळ आणि भूईमुग
तिळाचे लाडू सेवन करू शकता. थंडीत भूईमुग म्हणजे शेंगदाणे सेवन करणे खुप लाभदायक ठरते.

5 आंबट फळे
आंबट किंवा ज्या फळांमध्ये जास्त रस असतो अशी फळे सेवन करा. यामुळे शरीराला भरपूर उर्जा मिळते. आळस दूर होतो. मूड फ्रेश होतो. संत्रे, द्राक्ष, लिंबू, बेरी, अशी फळे सेवन करू शकता.

6 चॉकलेट
डार्क चॉकलेट सेवन केल्यास एनर्जी वेगाने वाढते. ब्लड प्रेशर आणि डिप्रेशनवर लाभादायक आहे. मूड चांगला राहातो.

7 रंगीत बेरी
मार्केटमध्ये जेवढे आंबट-गोड बेरी मिळतात, ती थंडीत सेवन करा. यामध्ये व्हिटॅमिन सी भरपूर असते. यामुळे आळस दूर होतो. आळस दूर होतो.