Winter Hair Care | हिवाळ्यात कशी घ्यायची केसांची काळजी, वापरा ‘हे’ हेअर मास्क

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Winter Hair Care | हिवाळ्यात केस गळणे आणि कोंडा होण्याच्या समस्या सामान्य आहेत. अशा स्थितीत या समस्यांपासून सुटका मिळवण्यासाठी (Winter Hair Care) तुम्ही कढीपत्त्याचा (Curry leaves) हेअर मास्क (Hair mask) वापरू शकता. कढीपत्ता केसांसाठी उपयुक्त मानला जातो. कढीपत्ता सौंदर्य आणि केसांची निगा राखण्याच्या उत्पादनांमध्ये वापरले जाते. हिवाळ्यात केस गळणे आणि कोंड्याची (dandruff) समस्या सामान्य आहे. या समस्यांपासून सुटका मिळवण्यासाठी तुम्ही कढीपत्त्याचे हेअर मास्क वापरू शकता. कढीपत्त्यामध्ये एंटी-इंफ्लेमेटरी (Anti-inflammatory) गुणधर्म केसांना कोणत्याही प्रकारच्या संसर्गापासून वाचवतात. जाणून घ्या हेअर मास्त तयार (Hair Care Tips) करण्याची पद्धती.

 

कढीपत्ता आणि दह्याचा हेअर मास्क
हा हेअर मास्क बनवण्यासाठी कढीपत्त्याची पेस्ट करुन घ्या. यामध्ये दोन चमचे दही घाला. ही पेस्ट तुमच्या केसांच्या मुळांपासून संपूर्ण केसावर लावा आणि 20 मिनिटे राहू द्या. त्यानंतर कोमट पाण्याने किंवा सौम्य शाम्पूने धुवा. हा हेअर पॅक तुम्ही आठवड्यातून दोन लावल्यास कोंड्याची समस्या दूर होईल. (Winter Hair Care)

आवळा, मेथी आणि कढीपत्त्याचा हेअर मास्क
हा हेअर मास्क बनवण्यासाठी आधी कढीपत्त्याची पानं बारीक करुन पेस्ट बनवा. यानंतर आवळा पावडर (Amla powder), मेथीची पावडर (Fenugreek powder) आणि कांद्याचा रस घाला. हे मिसळून पेस्ट बनवून ती केसांवर 30 मिनिटे राहू द्या. त्यानंतर कोमट पाण्याने केस धुवा. पण केस धुत असताना कोणत्याही शांपूचा वापर करुन नका. हा हेअर मास्क आठवड्यातून दोनदा वापरल्यानंतर तुम्हाला फरक दिसू लागेल.

 

कडुलिंबाचे तेल आणि कढीपत्त्याचा हेअर मास्क
कढीपत्त्याची पेस्ट बनवून त्यामध्ये कडुलिंबाचे तेल घाला.
हे मिश्रण चांगले मिसळा आणि केसांना लावा. एक तासानंतर सौम्य शाम्पूने केस धुवा.
त्यामुळे कोंड्यापासून तुमची सुटका होईल. तसेच केस चमकदार होण्यास मदत होईल.

 

टीप – वरील माहिती केवळ वाचकांच्या माहितीसाठी दिली आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्या.

 

Web Title :- Winter Hair Care | winter skin care health care hair care tips

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Sushmita Sen | सुष्मिता सेनची Oops Moment कॅमेरामध्ये कैद, हिल्समुळं पडता पडता वाचली अभिनेत्री; पाहा व्हायरल व्हिडिओ

Banana In Winters | हिवाळ्यात केळी खाण्याचे फायदे किंवा तोटे? ‘या’ लोकांनी राहावे दूर

Mia Khalifa | Ex पॉर्नस्टार मिया खलिफानं शेअर केले चक्क ब्रालेस फोटो, फोटोमुळं सोशल मीडियाचा वाढला पारा