पोलीसनामा ऑनलाइन टीम – Winter Health | अस्थमा (Asthma) ही एक अशी हेल्थ कंडिशन आहे ज्यामुळे श्वासनलिका आकुंचित होणे आणि सूज यासारख्या समस्या उद्भवू शकतात. ज्यांना अस्थमा आहे त्यांना त्याची लक्षणे हवामानातील बदलामुळे प्रभावित होतात हे माहित असते. (Winter Health) हिवाळ्यात हा त्रास वाढू शकतो. जेव्हा तापमान सामान्यपेक्षा कमी होते, तेव्हा कोल्ड इंड्यूज अस्थमाची लक्षणे आणखी वाईट होऊ शकतात. अनेकदा ही लक्षणे घराबाहेर पडल्यानंतर किंवा हलका व्यायाम केल्यावरही तीव्र होतात. त्यामुळे अस्थमा रुग्णांनी या काळात स्वतःची विशेष काळजी घ्यावी. हिवाळ्यात अस्थमाच्या रुग्णांनी कोणत्या गोष्टी करू नयेत, ते जाणून घेवूया (Asthma patients in winter)…
अस्थमाच्या रुग्णांनी हिवाळ्यात कोणत्या गोष्टी करू नयेत?
वेबएमडीनुसार, हिवाळ्यात अस्थमा अटॅक अधिक गंभीर असू शकतो. हिवाळ्यात अस्थमा रुग्णांसाठी दोन आव्हाने असतात, एक म्हणजे बहुतांश वेळ घरी घालवणे आणि दुसरे थंडी.
अस्थमाच्या रुग्णांनी हिवाळ्यात या गोष्टी टाळाव्यात :
१. बाहेर व्यायाम करणे –
थंड हवामानाचा अर्थ असा नाही की व्यायाम करू नये. पण, दम्याच्या रुग्णांनी घराबाहेर व्यायाम करू नये. यामुळे दम्याची लक्षणे आणखी बिकट होऊ शकतात. एवढेच नाही तर दीर्घकाळ एक्सरशन टाळा.
२. साफसफाई न करणे –
हिवाळ्यात आपण बहुतांश वेळ घरातच घालवतो. अशावेळी, घर वेळोवेळी व्हॅक्यूम करणे आणि ते धूळमुक्त करणे आवश्यक आहे जेणेकरुन अॅलर्जी कमी होऊ शकेल. जर घर स्वच्छ नसेल तर दम्याची लक्षणे गंभीर होऊ शकतात.
३. तोंडाने श्वास घेणे टाळा –
काही लोकांना तोंडाने श्वास घेण्याची सवय असते. जर दमा असेल, तर थंड तापमानात नाकाने श्वास घेणे आवश्यक आहे.
थंड वातावरणात तोंडाने श्वास घेतल्याने अस्थमा अटॅक ट्रिगर होऊ शकतो.
४. पाळीव प्राण्यांच्या आसपास जाणे टाळा –
जर घरात पाळीव प्राणी असेल तर यामुळे सुद्धा अस्थमा ट्रिगर होऊ शकतो. हिवाळ्यात हा त्रास आणखी वाढू शकतो.
अशावेळी, पाळीव प्राण्यापासून शक्य तितके दूर रहा जेणेकरुन अस्थमाची लक्षणे बिकट होणे टाळता येईल.
(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही.
त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)
Web Title :- Winter Health | 4 Things Asthma Patients Shouldn’t Do In Winter As Symptoms May Get Worse
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update