हिवाळ्यात शरीर राहील गरम, आरोग्य चांगले ठेवतील ‘हे’ 5 देशी सुपरफूड

Winter Health Care Tips : हवामान बदलताच लोकांच्या सर्दी-तापाच्या तक्रारी वाढू लागतात. अशावेळी स्व:ताला आरोग्यदायी ठेवणे आवश्यक असते. आपली इम्यूनिटी मजबूत ठेवण्यासाठी योग्य आहार आणि व्यायाम आवश्यक आहे. खोकला, सर्दी, ताप इत्यादी तक्रारी टाळण्यासाठी आणि शरीर गरम राखण्यासाठी हिवाळ्यात कोणती 5 सुपर देशी फूड सेवन करावीत ते जाणून घेवूयात…

बाजरी –
बाजरीमध्ये खनिज, फायबर,मॅग्नेशियम आणि पोटॅशियम भरपूर असते. बाजरीच्या भाकरी हिवाळ्यात सेवन केल्याने सांधेदुखीत दिलासा मिळतो, हृदयाचे आरोग्य आणि रक्त पातळ करण्यात मदत होते. उच्च रक्तदाबाच्या रूग्णांसाठी हे लाभदायक आहे.

मका –
हिवाळ्यात मक्याची भाकरी किंवा इतर पदार्थ सेवन करावे. हे त्वचा, केस, हृदय, मेंदू आणि पचनशक्तीसाठी चांगले आहे. थायरॉईड ग्रंथीचे कार्य सुधारते. इम्युनिटी चांगली राहते.

गुळ, तूपाचे सेवन –
गुळ आणि तूपाचे सेवन या काळात चांगले ठरते. सायनसच्या रूग्णांना लाभदायक आहे. शरीराला थंडीपासून वाचवण्यासाठी उपयोगी आहे. खोकला, सर्दीपासून बचाव होतो. उर्जा वाढते.

कुळीथ डाळ –
कुळीथ डाळीच्या सेवनाने स्टोनचा आजार दूर राहातो. त्वचा आणि शरीर हायड्रेटेड आणि पोषित ठेवते.

लोणी –
लोणी किंवा तूपाने शरीराला आवश्यक फॅट मिळते. याच्या सेवनाने पचनक्रिया चांगली राहते. व्हिटॅमिन डीची कमतरता असल्यास लोणी किंवा तूपाचे सेवन करावे.