Winter Health | हिवाळ्यात लवंग आणि काळी मिरी आरोग्यासाठी अतिशय आवश्यक, सेवन केल्याने होईल ‘इम्यून सिस्टम’ मजबूत!

0
610
Winter Health | clove and black pepper are very important for our health in winter
file photo

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Winter Health | हिवाळ्यात लवंग आणि काळी मिरी आरोग्यासाठी खूप महत्त्वाची असते. हिवाळ्यात याचे सेवन केल्यास आरोग्याला अनेक फायदे होतात. हिवाळ्यात अनेक प्रकारच्या आरोग्याच्या समस्या (Winter Health) उद्भवतात. त्यामुळे आरोग्य बिघडते. अशावेळी काळी मिरी आणि लवंगचे सेवन करून त्या समस्यांपासून आराम मिळू शकतो.

 

थंडीत फ्लू आणि विषाणूचा धोका वाढतो. अशावेळी इम्युनिटी मजबूत ठेवणे महत्वाचे आहे, ज्याद्वारे सर्दी-खोकला, ताप, घसा खवखवणे इत्यादी समस्या टाळू शकता. किचनमधील मसाले इम्युनिटी वाढवण्यास मदत करतात. स्वयंपाकघरात असे अनेक मसाले असतात, जे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहेत.

 

१. काळी मिरी
हिवाळ्यात काळी मिरी खूप उपयुक्त आहे. काळ्या मिरीमध्ये अँटी-ऑक्सिडंट गुणधर्म असतात. ते मेटाबॉलिज्म सुधारण्यास मदत करतात. याच्या सेवनाने अनेक प्रकारच्या आरोग्यविषयक समस्या दूर होतात. बरेच लोक हिवाळ्यात ती चहामध्ये वापरतात, जे खूप फायदेशीर आहे. तर काही लोक ती दुधात उकळून पितात.

२. लवंग
हिवाळ्यात लवंग हे देखील एक अत्यंत महत्वाचे औषध आहे, जे आरोग्याची काळजी घेते. लवंग अँटी-ऑक्सिडेंट, अँटी-सेप्टिक आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्मांनी समृद्ध आहे. तिचा प्रभाव गरम आहे. थंड वातावरणात लवंगचे सेवन केल्याने शरीर आतून उबदार राहते, ज्यामुळे मौसमी आजारांपासून दूर राहू शकता. (Winter Health)

 

३. हळद
हिवाळ्यात हळदीचे दूध पिणे फायदेशीर ठरते. हळदीमध्ये अँटी-ऑक्सिडेंट,
अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात. जे शरीराला अनेक आजारांपासून वाचवतात.
तिच्या वापरामुळे इम्युनिटी मजबूत होते. गरम दुधासोबत हळदीचे सेवन करणे खूप फायदेशीर मानले जाते.
म्हणूनच हिवाळ्यात हळदीचे दूध नियमितपणे प्यावे.

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही.
त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Winter Health | clove and black pepper are very important for our health in winter

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Ajit Pawar | संभाजी महाराजांना धर्मवीर म्हणण्यास नकार देणाऱ्या अजित पवारांची रवानगी पाकिस्तानात करा, भाजपच्या माजी आमदाराचा हल्लाबोल

Ranbir Kapoor | रणबीर कपूरच्या नवीन चित्रपटाचे पोस्टर आउट; होत आहे व्हायरल

Alia Bhatt | मातृत्वाबद्दल बोलताना आलिया भट्ट म्हणाली “मूल जन्माला घालण्याचा निर्णय…”