थंडीमध्ये तोंडावर वाफ घेण्याचे अनेक फायदे, जाणून घेतल्यास त्वचेसह आरोग्याच्या तक्रारी नक्की विसराल

पोलिसनामा ऑनलाईन – सध्या जगभरात कोरोनाची महामारी आहे. आजारपणाची सतत भीती सगळ्यांनाच वाटत असते. ११ महिन्यानंतर सुध्दा कोरोना पूर्णपणे थांबलेला नाही. शरीरावर वातावरणातील बदलाचा परिणाम होत असतो. कोरोना काळात तब्येत चांगली राहावी तसेच प्रतिकारशक्ती वाढण्यासाठी सगळेच वेगवेगळे उपाय करत आहेत. पोषक आहार, काढा, पिवळे हळदीचे दूध, गरम कपडे, वाफ घेणे हे उपाय सर्वच करतात.

थंडीच्या दिवसात सर्दी, खोकल्यापासून आराम मिळण्यासाठी तसेच घशाच्या समस्येसाठी लोक गरम पाण्याची वाफ घेतात. काहीजण त्वचेची काळजी घेण्यासाठी मसाज करण्याआधी वाफ घेतात. तर जाणून घेऊ शरीराला वाफ घेतल्याने होणारे फायदे …

वाफ घेण्याची पद्धत

– तुमच्याकडे वाफ घेण्याची मशीन नसेल तर एका भांड्यात तीन ग्लास पाणी टाकून झाकून ठेवा.

– हे पाच दहा मिनिटे गरम होऊ द्या. यानंतर डोक्यावर एक काॅटनचा टॉवेल घ्या आणि भांड्यावरील झाकण काढून पाच ते दहा मिनिटे वाफ घ्या.

– वाफ घेताना तोंडाला चटका बसणार नाही याची काळजी घ्या.

– आठवड्यातून दोन ते तीन वेळा ही पद्धत रिपीट करा .

वाफेचे फायदे

थंडीच्या दिवसात चेहऱ्यावर गरम पाण्याची वाफ घेतल्यास सर्दी-खोकला हे आजार होत नाही. हिवाळ्यात कोरडी झालेली त्वचा मऊ होते. चेहऱ्यावर चकाकी येते. चेहऱ्यावरआलेले डेट सेल्स नाहीसे होतात. चेहर्‍यावरील त्वचा मोकळी होते. रोज किंवा आठवड्यातून दोन-तीन दिवस चेहऱ्यावर गरम पाण्याची वाफ घ्या. परिणामी, त्वचेची घाण दूर होते पिंपल्स प्रॉब्लेम नियंत्रणात येतात.

वाफ घेतल्यानं धूळ प्रदूषणावर चेहर्‍यावर चिकटलेली घाण स्वच्छ होते. चेहऱ्याला ग्लो येतो. नियमित गरम वाफ घेतल्यास श्वसनाचा त्रास कमी होतो. नाक चोंदले असल्यास वाफ घेतल्याने नाक मोकळे होते. श्वासोच्छ्वास सुरळीत सुरु राहतो. वाफ घेतल्याने पिंपल्स पसरविणारे बॅक्टेरिया नष्ट होतात. आणि त्वचा पुन्हा श्वास घेऊ लागते. विनाकारण स्क्रबिंग करण्यापासून सुटका मिळते. वाफ घेतल्यानंतर दोन ते तीन दिवसानंतर पिंपल्सने भरलेला चेहरा थोडा खराब वाटू शकतो पण काही दिवसानंतर आपला चेहरा सुंदर दिसू लागतो. चेहऱ्याचे सर्व डाग जातात. चेहरा खूप स्वच्छ दिसतो. थंडीत अनेक जणांची त्वचा कोरडी होते, अशावेळी स्टीमिंग केल्यास त्वचेचा कोरडेपणा दूर होतो. चेहर्‍यावर चकाकी वाढते.