गुळासह ‘या’ गोष्टींचं करा सेवन, आजार कायमचे राहतील दूर, जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम –  गुळाचे सेवन आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते. हिवाळ्याच्या काळात निरोगी आणि तंदुरुस्त राहण्यासाठी, आहारात गुळाचा समावेश करा. गुळामध्ये लोह, व्हिटॅमिन सी, प्रथिने, मॅग्नेशियम आणि पोटॅशियमचे प्रमाण जास्त असते, ते शरीर निरोगी ठेवण्यास उपयुक्त ठरते. आजारांपासून वाचण्यासाठी तुम्ही गुळाबरोबर काही गोष्टी खाऊ शकता. या गोष्टी आणि गुळाचे सेवन करणे खूप फायदेशीर आहे. रोगांपासून सुरक्षित राहण्यासाठी गुळाबरोबर काय खावे हे जाणून घेऊ.

गूळ आणि शेंगदाणे

गूळ आणि शेंगदाणे सेवन आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. गूळ आणि शेंगदाणे सेवन केल्याने तुम्ही निरोगी आणि तंदुरुस्त राहू शकता. हिवाळ्यातील आजारांपासून दूर राहण्यासाठी गूळ व शेंगदाण्याचे सेवन करा.

गूळ आणि तीळ

तीळ आणि गुळाचे सेवन करून आपण आजारांपासून वाचू शकता. तिळात कॅल्शियम, मॅग्नेशियम, मॅंगनीज आणि झिंकचे प्रमाण जास्त असते, जे निरोगी शरीर टिकवून ठेवण्यास मदत करते. हिवाळ्यात गूळ व तीळ यांचे सेवन करणे खूप फायदेशीर आहे.

गूळ आणि तूप

तूप आणि गुळाचे सेवन केल्यास तुम्ही शरीर निरोगी आणि तंदुरुस्त ठेवू शकता. गूळ आणि तूप हे त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे. हिवाळ्यातील आजारांपासून सुरक्षित राहण्यासाठी आहारात गूळ आणि तूप घाला.

मेथीचे दाणे आणि गूळ

हिवाळ्यात मेथी दाणे आणि गूळ यांचे सेवन करणे खूप फायदेशीर आहे. हिवाळ्यात केसांशी संबंधित समस्या देखील उद्भवतात. केसांशी संबंधित समस्यांपासून सुरक्षित राहण्यासाठी मेथीची दाणे आणि गूळ खा.