Winter In Maharashtra | राज्यात थंडीचा जोर वाढला; ‘या’ जिल्ह्यात महाबळेश्वरपेक्षा जास्त थंडी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – यावर्षी पावसाने चांगले झोडपल्यानंतर आता महाराष्ट्रात थंडीचा (Winter In Maharashtra) जोर ही चांगला वाढत आहे. राज्यात बहुतांश भागात किमान तापमानात प्रचंड घट (Winter In Maharashtra) झाली असून कोकण (Kokan) वगळता उर्वरित भागात 15 अंशांच्या खाली तापमान गेले आहे.

 

महाराष्ट्रात सर्वात कमी तापमान नाशिकच्या (Nashik) ओझरमध्ये (Ozar) नोंदवले गेले असून तिथे पारा 6 अंश सेल्सियस इतका खाली गेला आहे. म्हणजेच महाबळेश्वरपेक्षा (Mahabaleshwar) जास्त थंडी (Cold) या वेळेस नाशिकमध्ये पाहायला मिळत आहे. यंदाच्या हंगामातील सर्वात निश्चांकी तापमानाची नोंद करण्यात आली आहे. कडाक्याच्या थंडीने द्राक्ष उत्पादक शेतकरी चिंतेत आहे. (Winter In Maharashtra)

 

शिवाय, औरंगाबादचा (Aurangabad) पाराही बराच कमी झाला आहे. औरंगाबादमधील तापमान 9.2 अंशावर आले आहे.
ग्रामीण भागामध्ये सर्वात जास्त थंडी अनुभवायला मिळत आहे. त्यामुळे नागरिकानीं शेकोट्यांचा आधार घेतला आहे.
आता, मध्य महाराष्ट्रात 22 नोव्हेंबरपर्यंत तीन दिवस कडाक्याची थंडी जाणवणार आहे.
त्यानंतर 27 नोव्हेंबरपासून तिसऱ्या आवर्तनाला सुरुवात होऊन थंडी आणखी वाढेल. अशी माहिती हवामानतज्ज्ञांनी (meteorological) दिली आहे

 

Web Title :- Winter In Maharashtra | cold wave in maharashtra know the lowest temperature in maharashtra

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Nitin Gadkari | राज्यपालांच्या ‘त्या’ वक्तव्यावर नितीन गडकरींची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

Govinda Naam Mera | अखेर ‘गोविंदा नाम मेरा’चा ट्रेलर प्रदर्शित; ट्रेलरमध्ये सयाजी शिंदे यांची झलक

Pune Pimpri Crime | पैसे दुप्पट करुन देण्याच्या बहाण्याने ज्येष्ठ नागरीकाला घातला 33 लाखांचा गंडा, बावधन मधील घटना