Winter Lip Care | हिवाळ्यात ओठ फाटत आहेत का?, मग एक पैसाही खर्च न करता असे बनवा मुलायम!

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Winter Lip Care | हिवाळ्यात ओठ फाटण्याची समस्या सर्वांनाच सतावते. परंतु, बाजारातील काही प्रॉडक्टने तात्पुरता आराम मिळतो. जर तुम्हाला ओठ मुलायम आणि सुंदर बनवायचे असतील तर आज आपण घरातील उपलब्ध असलेल्या अशा नैसर्गिक वस्तूंबाबत जाणून घेणार आहोत, ज्यांचा वापर सहज आणि स्वस्त सुद्धा आहे. (Winter Lip Care)

 

घरातील या 5 वस्तूंचा करा वापर

1. एलोवेरा जेल (Aloe vera gel)

एलोवेरा जेलचे फायदे अनेक आहेत. ओठ फाटले असतील तर दिवसात दोन वेळा ओठांवर एलोवेरा जेल लिप बामप्रमाणे लावा.

 

2. तूप (Ghee)

रात्री झोपताना ओठांवर तूपाचा पातळ थर लिप बामप्रमाणे लावू शकता सकाळी धुवून टाका.

 

3. मध आणि साखर (Honey and sugar)

ओठ सुंदर बनवण्यासाठी मधात हलकी साखर मिसळून ओठांना स्क्रब करा. हे रोज करू शकता. या स्क्रबने ओठ मुलायम आणि हायड्रेट होतील.

 

4. व्हिटॅमिन ई ऑईल (Vitamin E oil)

व्हिटॅमिन ई ऑईल सुद्धा ओठांसाठी खुप लाभदायक ठरू शकते. यासाठी एक कॅप्सूल कापून हे तेल झोपण्यापूर्वी ओठांना लावा आणि सकाळी धुवून टाका.

 

5. खोबरेल तेल किंवा बदाम तेल (Coconut oil or almond oil)

रोज रात्री झोपण्यापूर्वी खोबरेल तेल ओठांवर लावू शकता. खोबरेल तेलऐवजी बदाम तेलाचा सुद्धा वापर केला जाऊ शकतो. (Winter Lip Care)

 

Web Title :- Winter Lip Care | amazing home remedies for dry chapped lips during winters

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Coronavirus in Maharashtra | राज्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 906 नवीन रुग्णांचे निदान, जाणून घ्या इतर आकडेवारी

Pollution Effect | वायु प्रदूषणामुळे श्वास आणि फुफ्फुसाच्या 4 घातक आजारांचा धोका, ‘या’ 10 लक्षणांवर ठेवा लक्ष

EPFO | UAN लवकरात लवकर संलग्न करा Aadhaar सोबत, अन्यथा होऊ शकते मोठे नुकसान; जाणून घ्या