Winter Session 2022 | मुंबई महापालिकेच्या रूग्णालय घोटाळ्यात अडकणार ठाकरे परिवारातील जवळचा व्यक्ती?; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिले चौकशीचे आदेश…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – राज्याचे हिवाळी अधिवेशन (Winter Session 2022) हे सध्या नागपूर येथे सुरू आहे. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलीच खडाजंगी यादरम्यान पहायला मिळत आहे. त्यातच आता सत्ताधारी पक्षाचे आमदार प्रसाद लाड यांनी मुंबई महापालिकेच्या एका रूग्णालयात कोट्यावधी रूपयांचा टेंडर घोटाळा झाल्याचा आरोप केला आहे. याप्रकरणी युवासेनेचा बडा नेता तसेच ठाकरे गटाचा जवळचा व्यक्ती अडचणीत येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. (Winter Session 2022)

भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी मुंबई महापालिकेत सत्ताधारी असलेल्या शिवसेना ठाकरे गटावर नाव न घेता आरोप केले आहेत. ते म्हणाले, ‘मुंबई महापालिकेच्या हिरालाल भगवती हॉस्पिटलमध्ये 483 कोटी रुपयांचं टेंडर तेव्हाच्या महापालिकेतल्या सत्ताधाऱ्यांनी दिलं. 483 कोटींपैकी 200 कोटींचं काम इलेक्ट्रिक आणि मेकॅनिकलमध्ये होतं. टेंडरमध्ये दिलेल्या अटी प्रमाणे ब्रॅण्ड आणि वेंडर स्पेसिफिक दिले होते. पण आता काम होत असताना त्यातले ब्रॅण्ड आणि वेंडर बदलण्यात आले आहेत. तसेच जवळपास 200 कोटींचं सामान वेंडर बदलल्यामुळे कॉन्ट्रॅक्टरला 60-70 कोटी रुपयांमध्ये मिळणार आहेत. त्यामुळे महापालिकेचं 140 कोटी रुपयांचं नुकसान होणार आहे, त्यामुळे या लोकांवर तात्काळ कारवाई होणार का? हे काम थांबवलं जाणार का? या प्रकरणाची चौकशी लावावी.’ अशी मागणी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. (Winter Session 2022)

त्यावर माहिती घेऊन चौकशी करू असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. त्यावर भाजपचे विधानपरिषद आमदार प्रविण दरेकर मुख्यमंत्र्यांना म्हणाले, चौकशी कसली करताय? हा २०० कोटींचा भ्रष्टाचार आहे.
कोणाला पाठीशी घालत आहात? असा सवाल त्यांनी मुख्यमंत्र्यांना केला.
यावेळी गोंधळ घालणाऱ्या नेत्यांना विधानपरिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे यांनी ताकिद दिली.
त्यामुळे आता या प्रकरणी शिवसेना ठाकरे गटाच्या अडचणी वाढणार असल्याचे बोलले जात आहे.
(Winter Session 2022)

Web Title :-  Winter Session 2022 | bhagwati cooper hospital scam allegations close aid of thackeray family could be in problem

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Ajit Pawar | अनिल देशमुख यांच्या सुटकेनंतर अजित पवारांची प्रतिक्रिया, म्हणाले- ‘या प्रकरणचं सत्य…’

Shivsena Shinde Group | मुंबई महापालिकेत राडा, पालिकेतील सेनेच्या कार्यालयावर शिंदे गटाचा दावा; नेत्यांमध्ये जोरदार खडाजंगी (VIDEO)