Winter Session 2022 | भुखंड घोटाळ्याप्रकरणी विरोधकांनी मागितला मुख्यमंत्री शिंदेंचा राजीनामा…

नागपूर : पोलीसनामा ऑनलाईन – राज्याचे हिवाळी अधिवेशन (Winter Session 2022) कर्नाटक सीमाप्रश्न, महाविकास आघाडीच्या कार्यकाळात मंजुरी मिळालेल्या कामांना विद्यमान सरकारने दिलेली स्थगिती या कारणांमुळे चांगलेच तापले. त्यातच आता राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना एका भूखंड घोटाळ्यात राजीनामा देण्याची मागणी विरोधक करत आहेत. यावर मुख्यमंत्री यांनी विरोधकांना सभागृहात उत्तर दिले आहे. तसेच यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांची पाठराखन केली.

 

ठाकरे सरकारच्या काळात विद्यमान मुख्यमंत्री हे नगरविकास मंत्री होते. यादरम्यानच त्यांनी 86 कोटींचा भूखंड अवघ्या 2 कोटींना दिल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केला आहे. शिंदेंच्या या निर्णयानंतर कोर्टाने शिंदे यांच्यावर ताशेरे ओढले. त्यामुळे या प्रकरणावरून विरोधकांनी शिंदेच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

 

तर यावर उत्तर देताना राज्याचे उपमुख्यमंत्री यांनी मुख्यमंत्री शिंदेंची पाठराखन करत हा भूखंडाचा विषय नाही, हा गुंठेवारीचा आहे. 17 जुलै 2007 रोजी विलासराव देशमुख यांनी हा निर्णय घेतला होता. 49 लेआऊटपैकी 16 शिल्लक राहिले. यात 2009 आणि 2010 साली देखील शासन आदेश निघाला असा दावा फडणवीस यांनी केला.

तसेच यादरम्यानच्या काळात एक जनहित याचिका कोर्टात दाखल झाली. त्यावर न्यायालयाने एक समिती गठीत केली. पण यावेळी मंत्र्यांना न्यायालयीन वस्तुस्थिती लक्षात आणून द्यायला हवी होती. पण तसे झाले नाही. मंत्र्यांनी त्यामुळे निर्णय दिला. आणि त्यामुळे या प्रकरणात न्यायालयाने आपले निरीक्षण नोंदविले. असेही फडणवीस यांनी सांगितले.

 

त्याचबरोबर न्यायालयाने कुठेही ताशेरे ओढलेले नाहीत. जर वृत्तपत्रात आलेली बातमी खरी असेल तर स्थिती ‘जैसे थे’ राखण्यात यावी, असे सांगितले. 16 भूखंड नियमितीकरण रद्द करून त्याचा अहवाल न्यायालयाला सादर करण्यात आला आहे. न्यायालयाने सांगितलेली कार्यवाही पूर्ण करण्यात आली आहे, असही उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

 

Web Title :- Winter Session 2022 | chief minister eknath shinde accused of plot scam opposition demanded his resignation

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Congress | हात गाडीवर पेट्रोल डिझेलचे बॅरल ठेवून इंधन दरवाढीच्या निषेधार्थ काँग्रेसचे अनोखे आंदोलन

Love Jihad Law | महाराष्ट्रात ‘लव्ह जिहाद कायदा’ होणार? देवेंद्र फडणवीसांचे सभागृहात मोठे विधान

Winter Session 2022 | ठाकरे गटाला आणखी एक धक्का! विधानसभेच्या तालिका सभाध्यक्षांच्या यादीतून केले बेदखल…