Winter Session -2022 | ‘तुम्हाला मंत्रीपद हवं आहे का?’ देवेंद्र फडणवीस यांची ठाकरे गटाच्या आमदाराला ऑफर

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन – राज्याचे हिवाळी अधिवेशन (Winter Session -2022) आजपासून सुरु झाले आहे. मागील दोनवर्षे कोरोनामुळे (Corona) नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन होऊ शकले नाही. मात्र, यंदा दोन आठवडे हे अधिवेशन नागपूरमध्ये होणार आहे. या अधिवेशनात सत्ताधारी शिंदे सरकारला (Shinde Government) घेरण्यासाठी विरोधकांनी जोरदार तयारी केली आहे. आज शिवसेना ठाकरे गटाचे (Shivsena Thackeray Group) प्रतोद सुनील प्रभू (Sunil Prabhu) यांनी सत्ताधारी पक्षातील मंत्र्यांच्या बंगल्याला करण्यात आलेल्या रंगरंगोटीचा मुद्दा उपस्थित केला. यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी उत्तर दिलं.

सभागृहात (Winter Session -2022) बोलताना सुनील प्रभू यांनी हरकतीचा मुद्दा उपस्थित केला. ते म्हणाले, विद्यमान सरकार मध्ये एकही राज्यमंत्री नाही. तरीही अधिवेशनात राज्यमंत्र्यांचे सर्व बंगले सजवण्यात आले आहेत. या बंगल्यांची आवश्यकता नसताना ते सजवले गेले आहेत. एका बाजूला सरकार प्रकल्पांवरती करोडो रुपयांचे कर्ज उभं करत आहे. दुसऱ्या बाजूला सरकारी पैशांचा चुराडा होत आहे. हा पैशांचा अपव्यय असल्याचे प्रभू म्हणाले.

सुनील प्रभू यांच्या प्रश्नाला उत्तर देताना देवेंद्र फडणवीस यांनी थेट मंत्रीपदाची ऑफर (Offer) देऊन टाकली.
सार्वजनिक बांधकाम विभागाला थोडीच माहिती असते.
आम्ही कधी मंत्रिमंडळ विस्तार (Cabinet expansion) करणार आहे.
आम्ही अधिवेशनाच्या काळातही करु शकतो, तो मुख्यमंत्र्यांचा अधिकार आहे.
तुम्हाला संधी हवी आहे का?, त्यामुळे अधिवेशनाच्या निमित्ताने रंगरंगोटी केली जाते.
कोट्यावधी नाही तर, जेवढे आहेत, त्याचा हिशोब पाठवून देतो, असं मिश्कीलपणे फडणवीस म्हणाले.

Web Title :- Winter Session -2022 | devendra fadnavis offering ministry thackeray group leader sunil prabhu maharashtra assembly session

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Winter Session -2022 | ‘मलाही धमकी आली होती तेव्हा सरकारने…’, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा सभागृहात धक्कादायक खुलासा

Sarla Ek Koti | भन्नाट कलाकारांची फौज घेऊन आलाय सरला एक कोटीचा टिझर!

Sanskruti Balgude | मराठमोळी अभिनेत्री संस्कृती बालगुडे अभिनयच नाही तर या गोष्टींमध्येही आहे पुढे