Winter Session -2022 | ‘मलाही धमकी आली होती तेव्हा सरकारने…’, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा सभागृहात धक्कादायक खुलासा

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन – Winter Session -2022 | सोमवारपासून नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन (Winter Session -2022) सुरु झाले आहे. यावेळी सभागृहात विरोधी पक्षांकडून सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्लाबोल केला. माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Former Home Minister Dilip Walse Patil) म्हणाले की, सुरजागड येथील प्रकल्पात (Surjagad Project) चार हजार लोकांना रोजगार मिळाला. मात्र, हा प्रकल्प बंद पाडण्याच्या हालचाली नक्षलवाद्यांनी (Naxalites) सुरुवात केली आहे. दरम्यान, सकाळी नक्षलवाद्यांच्या धमकीचे पत्र आले होते.

या प्रकरणावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले की, सुरजागड येथे देवीचे स्थान आहे. त्याठिकाणी अजिबात मायनिंग केले जाणार नाही. जूनपर्यंत पहिला फेज सुरु होणार आहे. वीस कोटी रुपये त्याठिकाणी गुंतवणूक केली जाणार आहे. त्याठिकाणची जनता ही त्याला मान्यता देत आहे. त्या प्रकल्पांना विशेष रस्ता देणार असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात (Winter Session -2022) सांगितले.

यावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Congress Nana Patole) म्हणाले की, गडचिरोलीतील वस्तूस्थिती वेगळी आहे. उपमुख्यमंत्र्यांनी जी माहिती दिली ती तपासली पाहिजे. तेथे रस्ते अजिबात नाहीत. त्या प्रकल्पामुळे नक्षलवाद्यांना ताकद मिळत आहे. या प्रकरणाला तेवढे महत्व देऊ नका. तिथे रेल्वे गेली पाहिजे होती, असे पटोले म्हणाले.

यावर बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, नक्षलवाद्यांना घाबरुन कधीच महाराष्ट्र थांबणार नाही. त्यांना उत्तर देवू.
गडचिरोलीतील नक्षलवाद नावापुरता आहे. तोही संपवू, असेही ते म्हणाले.
तसेच नक्षलात भरती करायला बाहेरील राज्यातून तरुण आणले जात आहेत.
जर कुणाला ताब्यात घेतले असेल तर त्याला आम्ही सोडवू, असेही फडणवीस म्हणाले.

यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) म्हणाले,
सुरजागड प्रकल्प पुर्ण केला नाही तर महाराष्ट्र नक्षलवाद्यांसमोर झुकल्यासारखे होईल.
त्यामुळे तो प्रकल्प पूर्ण करणारच.
पण मला ज्यावेळेस आधी धमकी आली होती तेव्हा सरकारने Z+ सुरक्षा नाकरली होती,
असा धक्कादायक खुलासा एकनाथ शिंदे यांनी केला.

Web Title :- Winter Session -2022 | government denied z security to me when when i was threatened earlier cm eknath shinde criticize uddhav thackeray in winter session nagpur

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Sanjay Raut | महामोर्चा म्हणून संजय राऊतांनी ट्वीट केला मराठा मोर्चाचा व्हिडीओ; प्रकार लक्षात आल्यावर राऊतांची सारवासारव

Beed Minor Girl Gang Rape Case | बीड हादरले; अल्पवयीन मुलीवर सामुहिक बलात्कार

Hina Khan | ब्रेकअपच्या चर्चांवर अखेर हिना खानने सोडले मौन ; म्हणाली “आगामी वेब सिरीज…”