Winter Session 2022 | राज्यमंत्र्यांचे बंगले सजावटीवरून सुनिल प्रभुंच्या प्रश्नाला फडणवीसांचे मिश्किल शैलीत उत्तर. म्हणाले…..

नागपूर : पोलीसनामा ऑनलाईन – राज्याचे हिवाळी अधिवेशन (Winter Session 2022) हे आज नागपूरात सुरू झाले आहे. यादरम्यान विरोधकांकडून विविध मुद्यांवर राज्य सरकारला कोंडीत पकडण्यात येत आहे. यादरम्यान (Winter Session 2022) शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आमदार सुनिल प्रभू यांनी एक प्रश्न उपस्थित केला त्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या प्रश्नाला अतिशय मिश्किल शैलीत उत्तर दिले आहे.

सीमावाद तसेच महापुरूषांचा अपमान या मुद्यांवरून विरोधक आणि राज्य सरकारमध्ये चांगलीच खडाजंगी या अधिवेशनात पहायला मिळत आहे. त्यादम्यान ठाकरे गटाचे आमदार सुनिल प्रभू यांनी सरकारला प्रश्न विचारला. राज्यात राज्यमंत्री नसताना विनाकारण राज्य मंत्र्यांचे बंगले का सजवण्यात आले आहेत. त्यावर प्रभूंना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या अनुभवाचा पुरेपुर फायदा घेत मिश्कील शैलीत उत्तर दिले की, राज्य मंत्रीमंडळाचा विस्तार कधी करायचा याचा सर्वस्वी अधिकार मुख्यमंत्र्यांना असतो. त्यामुळे ते सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना माहित नसते. असा टोला फडणवीसांनी लगावला.

तसेच त्यावर पुढे बोलताना उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, आम्हाला वाटलं तर या अधिवेशनादरम्यान देखील आम्ही मंत्रीमंडळ विस्तार करू शकतो. त्यावर प्रभू म्हणाले की, लवकर विस्तार करा मग.
त्यांच्या या सल्ल्यावर उत्तर देताना फडणवीसांनी प्रभूंना चांगलेच कात्रीत पकडले.
फडणवीस म्हणाले, तुम्हाला हवयं का मंत्रीपद? फडणवीसांच्या या हजरजबाबी उत्तराने मात्र सभागृहात चांगलाच हाशा पिकला.

दरम्यान, कर्नाटक सरकारने कर्नाटकातील मराठी नेत्यांना अटक केल्याचे पडसाद या हिवाळी अधिवेशनात
उमटत आहेत. तसेच कर्नाटकमध्ये महाराष्ट्र एकीकरण समितीने आयोजीत केलेल्या मोर्चाला देखील
कर्नाटक पोलिसांनी परवानगी नाकारली असून कर्नाटकात या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कलम १४४ लागू
करण्यात आला आहे.

Web Title :- Winter Session 2022 | maharashtra assembly winter session 2022 devendra fadanvis offer minister post to thackeray camp mla sunil prabhu

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Winter Session -2022 | ‘मलाही धमकी आली होती तेव्हा सरकारने…’, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा सभागृहात धक्कादायक खुलासा

Sarla Ek Koti | भन्नाट कलाकारांची फौज घेऊन आलाय सरला एक कोटीचा टिझर!

Sanskruti Balgude | मराठमोळी अभिनेत्री संस्कृती बालगुडे अभिनयच नाही तर या गोष्टींमध्येही आहे पुढे